27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरअर्थजगतट्विटर ब्लूची सशुल्क सेवा भारतात सुरू.. अशी मिळेल सुविधा

ट्विटर ब्लूची सशुल्क सेवा भारतात सुरू.. अशी मिळेल सुविधा

युजर्ससाठी वार्षिक योजना देखील उपलब्ध

Google News Follow

Related

अमेरिका, कॅनडा, ब्रिटन , न्यूझीलंड, जपान आणि ऑस्ट्रेलियानंतर लोकप्रिय सोशल मीडिया हँडल ट्विटरने भारतात ट्विटर ब्लू सेवा सुरु केली आहे. अर्थात ट्विटर ब्लू ही सशुल्क सेवा असेल आणि यासाठी युजर्सकडून शुल्क आकारले जाईल. कंपनीचे नवे मालक एलोन मस्क यांनी ट्विटर ब्लूच्या सशुल्क सेवेची माहिती गेल्या वर्षीच दिली होती.

मोबाईलवर ट्विटर वापरणाऱ्या भारतीय आयओएस आणि अँड्रॉइड  ट्विटर युजर्सना एका महिन्यासाठी ९०० रुपये मोजावे लागतील, तर ट्विटरच्या वेब यूजर्सना या सेवेसाठी दरमहा ६५० रुपये मोजावे लागणार आहेत. त्याच्याच जोडीला ट्विटर युजर्ससाठी वार्षिक योजना देखील दिली जात आहे. वर्षभर ट्विटर ब्लूच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी भारतीय वापरकर्त्यांना ६,८०० रुपयांचा प्लॅनही देण्यात आला आहे.

पैसे भरल्यास हे मिळतील फायदे
ट्विटर ब्लूची सशुल्क सेवा घेतल्यावर युजर्सना कंपनीकडून अनेक फायदे दिले जाणार आहेत. ट्विटर ब्लूची सशुल्क सेवा वापरणाऱ्या युजर्सना ४००० शब्दांपर्यंत ट्विट करण्याची सुविधा असेल. इतकेच नाही तर सशुल्क सेवा घेणार्‍या युजर्सना इतर ट्विटर युजर्सच्या तुलनेत कमी जाहिरातीही पाहायला मिळतील.याशिवाय सशुल्क सेवा घेणार्‍या युजर्सचे ट्विट आणि रिप्लाय यांनाही कंपनीकडून प्राधान्य दिले जाईल. विशेष म्हणजे सशुल्क सेवा घेणाऱ्या युजर्सना उच्च दर्जाचे व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधाही मिळणार आहे.

हे ही वाचा:

बहुप्रतीक्षित डबल डेकर वातानुकूलित ई बस सेवा पुढील आठवड्यात सुरु

पीएफआयला २०४७ पर्यंत भारतात स्थापन करायचे होते इस्लामिक राज्य

उद्धव ठाकरेंसमोर त्यांचेच उपनेते वादाला पेटले

राष्ट्रवादीचे औरंगजेब प्रेम पुन्हा जागृत

अशा प्रकारे मिळेल ट्विटर ब्लू 
ट्विटर ब्लूसाठी साइन अप करण्यासाठी, प्रथम ट्विटर एप उघडा आणि प्रोफाइल मेनूवर जा. यानंतर ट्विटर ब्लू निवडावे लागेल. सबस्क्राईब बटण निवडावे लागेल. यानंतर फोन नंबरची पडताळणी करावी लागेल. स्क्रीनवर दिसणार्‍या सूचनांचे पालन करावे लागेल. सबस्क्रिप्शन शुल्क भरल्याची खात्री पटल्यानंतर , तुम्ही ट्विटर ब्लूचे सदस्य होऊ शकाल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा