कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे याने आपला भाऊ मिलिंद तेलतुंबडे याला माओवादी चळवळ वाढवायला मदत केली असा आरोप राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने केला आहे. आयआयटी खरगपूरचे प्राध्यापक राहिलेला आनंद तेलतुंबडे हे ‘वॉन्टेड’ माओवादी मिलिंद तेलतुंबडे याचे भाऊ आहेत. आनंद याच्या प्रोत्साहनानेच मिलिंद तेलतुंबडे हा माओवादी चळवळीत सामील झाला असा ठपका राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने ठेवला आहे.
आनंद तेलतुंबडे याने वेगवेगळया आंतरराष्ट्रीय परिषदांमधून आणलेले ‘बंदी असलेले साहित्य’ भाऊ मिलिंद पर्यंत पोहोचवले. या साहित्याच्या आधारे मिलिंद तेलतुंबडे याने शहरी भागात माओवादी चळवळ वाढवायला सुरुवात केली. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने आनंद तेलतुंबडेच्या जामिन अर्जावर आपली बाजू मांडताना हा ठपका ठेवला आहे. आनंद तेलतुंबडे याने राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.
हे ही वाचा:
मिलिंद तेलतुंबडे हा आनंद तेलतुंबडेचा भाऊ असून तो एक ‘वॉन्टेड’ माओवादी आहे. तो माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा सचिव असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा त्याच्या शोधात असून त्याच्यावर ५० लाखांचा इनाम आहे. आपण गेली २५ वर्ष आपल्या भावाच्या संपर्कात नाही असा दावा आनंद तेलतुंबडे करत असला तरीही आनंद तेलतुंबडे हा सुद्धा बंदी असलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे असे दावा राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून करण्यात आला आहे.