30 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरक्राईमनामापोलिस अँब्युलन्समधून आले, बदनाम वस्तीत शिरले आणि...

पोलिस अँब्युलन्समधून आले, बदनाम वस्तीत शिरले आणि…

Google News Follow

Related

मुंबई पोलिसांच्या ‘स्पेशल २६’ या गठीत करण्यात आलेल्या विशेष पथकाने शनिवारी ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील ईराणी वस्तीतून एका सराईत गुन्हेगाराचा मुसक्या आवळून मोहीम फत्ते केली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या विशेष पथकावर स्थानिक पुरुष आणि महिलांकडून हल्ले देखील करण्यात आले परंतु स्थानिकांचे हल्ले परतावून लावत मुंबई पोलिसांच्या या विशेष पथकाने कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

मोहम्मद जाकिर सय्यद उर्फ सांगा (२५)असे मुसक्या आवळण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. मोहम्मद जाकिर हा मुंबई पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगाराच्या यादीतील टॉप मोस्ट वॉन्टेड आरोपीपैकी एक आहे. मुंबईत त्याच्यावर जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून अद्याप तो पोलिसाच्या हाती लागलेला नव्हता. मुंबईच्या उत्तर उपनगरात त्याच्यावर सर्वाधिक गुन्हे आहे.

मोहम्मद जाकिर उर्फ सांगा याला अटक करण्यासाठी मुंबई पोलीस दलाच्या परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त अजय कुमार बन्सल यांनी बोरिवली, एमएचबी, मालाड, चारकोप,गोरेगाव इत्यादी पोलीस ठाण्यात तील निवडक अधिकारी आणि अंमलदार असे २६ जणांचे विशेष पथक गठीत केले होते, या पथकाला ‘स्पेशल २६’ असे नाव देण्यात आले. मोहम्मद जाकिर हा खतरनाक आरोपी असून तो सहसा पोलिसांच्या हाती लागत नाही, ठाणे जिल्ह्यातील कल्याण नजीक असलेल्या आंबिवलीतील ईराणी वस्तीत तो वास्तव्यास आहे अशी माहिती मिळाली होती.

हे ही वाचा:

तुर्कीत भूकंपाचे तांडव .. झोपेतच ६०० जणांचा मृत्यू.. इमारती कोसळल्या

नाना पटोलेंना आडव्या गेलेल्या मांजरीला कार्यकर्ते आडवे गेले!

कसबा, चिंचवडसाठी भाजपाचे शक्तीप्रदर्शन; रासने, अश्विनी जगतापांनी भरले अर्ज

चिनी अ‍ॅपवर भारताचा पुन्हा सर्जिकल स्ट्राईक

परंतु या वस्तीतून एखाद्या आरोपीला अटक करणे म्हणजे अवघड होते, अंबिवलीतील ईराणी वस्ती म्हणजे फार वर्षापासुन बदनाम झालेली वस्ती आहे, या वस्तीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगार वास्तव्यास आहे. इतर शहरामध्ये गुन्हे करून हे गुन्हेगार या वस्तीत आश्रय करतात. या वस्तीत आरोपीला अटक करण्यासाठी येणाऱ्या पोलिसांवर येथील महिला पुरुष हल्ले करून त्यांना पिटाळून लावतात ही येथील ख्याती आहे.

या वस्तीत येणाऱ्या प्रत्येक नवीन व्यक्तीकडे पोलीस खबरी अथवा पोलीस असल्याच्या संशयातून बघितले जाते. पोलीस वस्तीकडे येत असल्याची माहिती अगोदरच यावस्तीत पोहचते आणि येथील महिला या आरोपीना पळवून लावण्यास मदत करतात. अशा या ईराणी वस्तीतून मोहम्मद जाकिर याला उचलण्याचा विडा ‘स्पेशल २६’ या टीमने उचलला होता. यासाठी पोलीस उपायुक्त बन्सल यांनी योजना आखली. विशेष पथकाच्या तीन टीम तयार करण्यात आल्या, पोलीस वाहनाचा वापर न करता रुग्णवाहिके तून जाण्याचे ठरले. त्यासाठी दोन रुग्णवाहिका, सर्व्हिस रिव्हॉल्वर, लाठ्या काठ्या, हातकडी इत्यादीचा वापर करण्याचे ठरले.

ठरलेल्या योजनेनुसार शनिवारी सायंकाळी विशेष पथक रुग्णवाहिकेतून तसेच खाजगी वाहनातून आंबिवलीच्या दिशेने रवाना झाले. ईराणी वस्ती जवळ येताच पोलीस पथकातील टीम १ ही चहाच्या एका टपरीजवळ पोहचले, मोहम्मद जाकिर हा आरोपी त्या ठिकाणी बसला होता, त्याला उचलणार तेवढ्यात वस्तीत पोलीस घुसल्याची बोंबाबोंब झाली आणि आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, काही वेळात वस्तीतून शेकडो ईराणी महिला पुरुष पोलिसांच्या दिशेने धावत आले व त्यांनी आरोपीचा बचाव करण्यासाठी पोलिसावर हल्ले करू लागले.

मात्र पोलिसानी त्यांना न जुमानता मोहम्मद जाकिरच्या मुसक्या आवळून त्याला एका रुग्णवाहिकेत कोंबले व रुग्णवाहिका वस्तीच्या बाहेर काढत असताना पाठीमागून महिला पुरुषाचे जथ्येच्या जथ्ये पोलिसांवर दगडफेक करून आरोपीच्या सुटकेसाठी प्रयत्न करू लागले. काही वेळातच पोलिसांची वाहने मुख्य रस्त्यावर लागली आणि तेथून थेट मुंबईच्या दिशेने आरोपीला घेऊन रवाना झाले. अश्याप्रकारे स्पेशल २६ या टीमने आरोपीला अटक करून मिशन आंबिवली ईराणी वस्ती यशस्वी केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा