नुकत्याच रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या ‘अमृत भारत योजनेचा’ एक भाग म्हणून कोल्हापूर, सांगली ,मिरज, आणि सातारा या रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. याआधी मध्य रेल्वेने मिरज आणि कोल्हापूर स्थानकांना एक मॉडेल रेल्वे स्थानक बनवण्याची योजना घोषित केली होती. यावेळच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या पायाभूत सुविधांकरता अडीच लाख कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. यामध्ये २,८०० किलोमीटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण , विद्युतीकरण आणि नवीन रेल्वेच्या लीने टाकणे या सारख्या कामाचा समावेश आहे.
अमृत भारत योजने अंतर्गत देशभरातील १,२७५ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करणार आहेत. मिरज जंकशन हे पुणे विभागात पुणे स्थानकानंतर महसूल देणारे दुसरे स्थानक आहे. पुनर्विकासांतर्गत मिरज स्थानक , सगळ्या फलाटांची उंची लांबी , रुंदी वाढवणे ,त्यात सुधारणा करणे , पिट लाईनचे रखडलेले काम सुरु करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत.
पुणे विभागांतर्गत मिरज, पुणे, कोल्हापूर सातारा, चिंचवड, कराड, सांगली, हडपसर, बारामती, लोणंद , तळेगाव, आकुर्डी , हातकणंगले, वाठार, देहूरोड, उरली, केडगाव, शिवाजीनगर स्थानकांचा पुनर्विकास करण्याच्या यादीत समावेश आहे.
हे ही वाचा:
मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी
दिव्यांग, अनाथ युवकांसाठी दीपस्तंभ मनोबल देशातील आदर्श प्रकल्प
देशभरात एकूण ४०० वंदे भारत गाड्या सुरु केल्या जातील . महाराष्ट्रात शिर्डी मुंबई आणि सोलापूर मुंबई मार्गावर वंदे भारत गाड्या सुरु केल्या आहेत. त्याच मार्गावर कोल्हापूर मुंबई हि वंदे भारत सुरु करणार आहेत मुंबई कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे हि ट्रेन पूर्ण क्षमतेने कमी वेळेत सुरु होऊ शकते. असे मध्य रेल्वेचे सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी म्हणाले. सध्या कोल्हापूर ला जाईल दोनच गाड्या आहेत महलक्समि एक्सप्रेस नि कोयना एक्सप्रेस त्याला बराच वेळ लागतो त्यामुळे या मार्गावर वंदे भारत सारखी एखादी एक्सप्रेस सुरु झाली तर त्याचा फायदा अनेक प्रवाशांना होईल.