अदानी कंपनीच्या एफपीओ अर्थात समभाग विक्री मधून माघार घेण्याच्या निर्णयाचा देशाच्या आर्थिक प्रतिमेवर कोणताही परिणाम दिसून आला नसल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मुंबईतील एका कार्यक्रमात केले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर देखील भारताचा परकीय चलन साठा आठ अब्ज डॉलर ने वाढला आहे. भारतावरील विश्वास , कोविड काळातही अर्थव्यवस्था जपून ठेवली आणि भारताच्या नेतृत्वाबद्दल विश्वास असल्यामुळे अदानी समूहाने आत्तापर्यंत १२० अब्ज डॉलर गमावले आहेत, तरीही आपल्या देशासाठी काही फरक पडणार नाही असे, अर्थसंकल्पातील तरतुदींविषयी मुंबईतील व्यवसाय आणि उद्योगाशी संबंधित प्रतिनिधींशी बोलताना आपले मत अर्थमंत्र्यांनी मांडले.
अदानी समूहाच्या संबंधित प्रश्नावर त्यांनी सांगितले की, देशाच्या वित्तीय क्षेत्राशी संबंधित नियामक स्वतंत्र असून ते या पैलूंकडे लक्ष देणार आहेत. सेबीकडे भांडवली बाजारात स्थिरता सुनिश्चित करण्याची क्षमता आहे. आणि सेबीलाच बाजारातील परिस्थिती नियंत्रित ठेवण्याचे सर्वाधिकार आहेत. याशिवाय रिझर्व बँकेने भारतातील बँकिंग क्षेत्र स्थिर आणि मजबूत असल्याचे स्पष्ट केले आहे. हे सीतारामन यांनी अधोरेखित केले. भांडवल बाजारात अनेक कंपन्या या समभाग विक्रीसाठी प्रस्ताव आणत असतात. प्रत्येक बाजारपेठेत चढउतार आपण बघत असतो. पण भारताच्या अर्थव्यवस्थेतेचे चित्र चांगले आहे, असेही पुढे अर्थमंत्री म्हणाल्या.
हे ही वाचा:
मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी
दिव्यांग, अनाथ युवकांसाठी दीपस्तंभ मनोबल देशातील आदर्श प्रकल्प
यावर्षीच्या अर्थसंकल्पात सात लाख रुपयांपर्यंत उत्पन्नाला करमुक्त करून देणारी नवीन कर प्रणाली ही मूलभूत करप्रणाली असेल अशी अर्थसंकल्पात घोषणा झाली पण, करदात्यांना जुन्याच करप्रणालीचा स्वीकार करण्याचा पर्याय खुला असून जुनी प्रणाली रद्द झालेली नाही आणि त्याला कोणतेच कालमर्यादेचे बंधन नाही असेही अर्थमंत्री म्हणाल्या. याशिवाय लोकांना त्यांचे पैसे कुठे कसे वापरावे काई नियोजन करावे याच्या साठी सुद्धा अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पामुळे जास्तीत जास्त जनतेकडे पैसे शिल्लक राहणार असल्याचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत. नागेश्वर यांनी म्हंटले आहे.