25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरअर्थजगतप्रथमच ५० हजार कोटींपेक्षा अधिकचा बीएमसीचा अर्थसंकल्प

प्रथमच ५० हजार कोटींपेक्षा अधिकचा बीएमसीचा अर्थसंकल्प

नव्या कराचा भार नाही, नवे प्रकल्प नाहीत

Google News Follow

Related

देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक आय.एस. चहल यांनी २०१३-२४ या वर्षासाठी कोणत्याही नवीन कराचा भार नसलेला ५२,६१९. ०७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. २०२२-२३ वर्षासाठीवडूक ४५, ९४९. २१ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत या अर्थसंकल्पाचे आक्रमणे १४. ५२ % जास्त आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्प ६,७७० कोटींनी वाढला आहे.

आयुक्त चहल यांनी मांडलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही नवीन प्रकल्पांचा उल्लेख केलेला नाही. तर विद्यमान आणि प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यावर बाहेर देण्या आला आहे. या विद्यमान प्रकल्पामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रकल्पांचा समावेश आहे. त्यामुळे आता या प्रकल्पांना गती मिळणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात प्रदूषण नियंत्रणासाठी १५०० कोटी रुपये तर गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी १०६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बेस्टसाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या लक्षात घेऊन ३२ ठिकाणी सार्वजनिक वाहनतळ उभारणारण्यात येणार आहेत. गेट वे ऑफ इंडिया, वाहतूक बेटे, वनीकरण, समुद्र किनारे, सुशोभीकरण, रोषणाईसाठी १७२९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

करमाफीनंतर का उडाला गोंधळ?

प्रभादेवीत दारूड्यांची जत्रा

मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी

दिव्यांग, अनाथ युवकांसाठी दीपस्तंभ मनोबल देशातील आदर्श प्रकल्प 

मुंबई महापालिकेला जकातीपोटी शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई सन २०२२-२३ मध्ये जकातीपोटी नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून २११४२९.७३ कोटी रु. इतके अनुदान अंदाजले होते. त्यापैकी जानेवारी २०२३ पर्यंत १९५११.५० कोटी इतके अनुदान प्राप्त झाले आहे. सन २०२३ २४ मध्ये नुकसान भरपाई म्हणून १२३४४.१० कोटी इतके उत्पन्न अंदाजित आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा