‘जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा’ हे गीत आज आपण गेली सहा दशके ऐकत आहोत. नुकताच या गीताला राज्यगीताचा दर्जा प्राप्त झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि नेते छगन भुजबळ यांना राज्यगीतावर पोटशूळ उठला आहे.
राज्यगीताबाबत आव्हाड म्हणतात , एके काळी असं म्हंटले जायचे की हिमालय सह्याद्रीला घाबरतो ,आता सह्याद्री हिमालयासमोर उभे राहायला पण तयार नाही. त्या राज्य गीतातील सर्वात मोठे कडवे “काळ्या छातीवरी” तेच काढून टाकले ,हे खरे असेल तर दुर्दैवी आहे. ह्याबद्दल महाराष्ट्राला उत्तर द्यायला लागेल ना कि तुम्ही हे कडवे का गाळले काय कारण काय ,ह्या गीतातल्या या तिसऱ्या कडव्यात असे काय आहे. जे महाराष्ट्राला पसंत पडणार नाही,असा सवाल ते महाराष्ट्र सरकारला विचारात आहेत. तर छगन भुजबळ म्हणतात, गाणे हे संपूर्णच घ्या ना, गाणे अर्धवट घेऊन काय होणार आहे दिल्लीवाले काय रागावणार नाही आहेत पूर्ण गाणे घेतल्यामुळे काळजी करायचे काय कारण आहे. आपण खरोखरच जे आहे ना मुंबई महाराष्ट्र वगैरे आहे जे दिल्लीचे अर्थव्यवस्था सांभाळण्यापासून सर्व गोष्टी मध्ये आपण दिल्ली बरोबर असतोच ना असा उलटा सवालच त्यांनी केला आहे.
कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतामधील २ चरणांचे गीत महाराष्ट्राचे #राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यगीत गायन, वादन यासंदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. pic.twitter.com/k0WMQYwjAv
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 31, 2023
खरे तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्र डिजिआयपीच्या ट्विटर हॅन्डल वर याबाबत कालच घोषणा करण्यात आली यामध्ये ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हि संपूर्ण ओळ दिसून येते पण अनेक जणांनी यावर चुकीचे भाष्य केल्यामुळे महाराष्ट्र सांस्कृतिक खात्याने स्पष्टीकरण देत संपूर्ण गीतच प्रसिद्ध केले आहे.
या राज्यांचं आहे अधिकृत राज्यगीत
सध्या देशांत केवळ १२ राज्यांचं स्वत:चं अधिकृत राज्यगीत आहे. त्यात आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीगसड, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, ओडिशा, पुद्दूचेरी, तामिळनाडू आणि उत्तरखंड या राज्यांचा समावेश आहे.