केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ वर्षासाठीच्या अमृतकालच्या या पहिल्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्डाची गरज आता भासणार नाही.सरकरी संस्थांच्या सर्व प्रणालींमध्ये ओळखपत्र म्हणून आता पॅन कार्डचा वापर केला जाईल. सरकारच्या या निर्णयामुळे केवायसीची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. व्यावसायिक आस्थापनांसाठी पॅन असणे आवश्यक आहे. यामुळे केवायसी प्रक्रिया आणखी सुलभ होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सरकारच्या या निर्णयानुसार, युनिफाइड फाइलिंग सिस्टीमसाठी परवानगी असलेले केवायसी मानदंड सुलभ केले जातील.आतापर्यंत अनेक ठिकाणी केवायसी करण्यासाठी आधार आणि पॅन आवश्यक होते. त्याचबरोबर या निर्णयानंतर केवायसीची प्रक्रिया पॅनकार्डद्वारेच पूर्ण होईल.याविषयी बोलताना निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, यामुळे व्यवसाय सुलभतेला चालना मिळेल.
हे ही वाचा:
७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त झाले पण म्हणजे नेमके कसे?
फडणवीस म्हणाले, सर्वजनहिताय अर्थसंकल्प
निर्मला सीतारामन यांनी कोणत्या ‘सप्तर्षी’चा केला उल्लेख?
आशीर्वाद टॉवरला लागलेल्या भीषण आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू,
अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आता केवायसी प्रक्रिया सुलभ केली जाईल. आर्थिक यंत्रणेशी बोलून ते पूर्णपणे डिजिटल केले जाईल. सर्व डिजिटल प्रणालींसाठी पॅन कार्ड हीच ओळख असेल. युनिफाइड फाइलिंग प्रक्रिया सेटअप केली जाईल. वन स्टॉप सोल्यूशन त्यासाठी असेल . डिजी लॉकर आणि आधारच्या माध्यमातून हे एक स्टॉप सोल्यूशन उपलब्ध करून देण्यात येईल. एकच सामायिक पोर्टलच्या माध्यमातून एकाच ठिकाणी डेटा असेल, विविध एजन्सी त्याचा वापर करू शकतील. यामुळे वारंवार डेटा देण्याची गरज भासणार नाही, मात्र यासाठी युजरची संमती अत्यंत महत्त्वाची असेल.