25 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरदेश दुनिया'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार विजेत्यांना आता मिळणार एवढी रक्कम

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार विजेत्यांना आता मिळणार एवढी रक्कम

महाराष्ट्र भूषण पुरस्कारांत भरीव वाढ

Google News Follow

Related

महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम आता वाढविण्यात आली आहे. याआधीच्या तुलनेत ही रक्कम दुपटीपेक्षा अधिक करण्यात आली आहे.

या पुरस्काराची रक्कम दहा लाख रुपयांवरून २५ लाख रुपये करण्यात आली आहे.आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हा पुरस्कार आता नव्या स्वरुपात, आणि आणखी दिमाखदार ठरावा यासाठी सुद्धा प्रयत्न व्हावेत असा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या अनुषंगाने एक बैठक झाली.

 

या बैठकीस  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच पुरस्कार समितीचे सदस्य ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ विधीज्ज्ञ अँड. उज्ज्वल निकम, प्रा. शशिकला वंजारी, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत आदी दृकश्राव्य प्रणालीद्वारे या बैठकीत उपस्थित होते.

पुरस्कारासाठी सुमारे २७ नावांचा प्रस्ताव

बैठकीत पुरस्काराच्या स्वरुपाबाबत तपशीलवार चर्चा झाली.या पुरस्कारासाठी जवळ जवळ २७ नावांचा प्रस्ताव सरकारकडे आला होता , त्याबाबतही चर्चा झाली. काहींनी आणखी नवीन नावेही सुचविली आहेत . त्यांचाही नव्याने विचार करण्याचे ठरवले आहे. तसेच पुरस्कारच्या रक्कमेत भरीव वाढ करण्याच्या सूचनेवरही सकारात्मक चर्चा झाली. आतापर्यंत पुरस्कारात दहा लाख रुपये देण्यात येत होते.

हे ही वाचा:

दिलासा..चारधाम यात्रेसाठी जोशीमठ सुरक्षित

अनिल परब यांचे कार्यालय तोडले, किरीट सोमय्या भेट देणार

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या अर्थसंकल्पाकडे साऱ्या जगाचे लक्ष

…अदानींमुळे म्हणे LIC बुडाली!

 

या पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करून ती आता २५ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पुरस्कार आणखी दिमाखदार ठरावा, यासाठी नव्या स्वरुपातील नियमावली निश्चित करण्यात यावी असेही ठरले आहे. महाराष्ट्रात अनेक कर्तबगार व्यक्तिमत्व आहेत. अनेकांनी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. अशा अनेक व्यक्तिमत्वांच्या या पुरस्कारासाठी विचार व्हावा. याकरिता सर्वंकष अशी नियमावली करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा