27 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरदेश दुनियाशिवाजी पार्कवर हिंदू जनआक्रोश मोर्चासाठी हिंदू समाज एकवटला

शिवाजी पार्कवर हिंदू जनआक्रोश मोर्चासाठी हिंदू समाज एकवटला

अवघा शिवाजी पार्क भगवामय

Google News Follow

Related

लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकाळ हिंदू समाज एकवटला आहे. मुंबई आणि राज्याच्या विविध भागातून हजारोंच्या संख्येने हिंदू समाजातील बांधव आणि अनेक हिंदू संघटना या जण ककरोश मोर्चामध्ये सहभागी झालेल्या दिसत आहेत. आज शिवाजी पार्क येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. भगवे धवज हातात घेत लव्ह जिहाद विरोधातील घोषणांनी शिवाजी पार्कचा परिसर दुमदुमून गेला आहे. लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलींचे कुटुंब आणि ज्यांना फसवण्यात आलेलं आहे, अशा काही पिडीताही या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. सकाळी दहा वाजता या हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. अनेक भाजपचे नेते सुद्धा या मोर्चाला हजेरी लावणार आहेत.

देशात तसेच राज्यात वाढलेल्या लव्ह जिहादच्या घटना, मुंबईत फोफावलेले लँड माफिया आणि मशिदीवरील भोंग्या विरोधात सकल हिंदू समाजातर्फे हा महामोर्चा काढला जाणार आहे. मोर्चा शांततेत पार पाडवा यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाजप आणि शिंदे गटाचे अनेक नेते, कार्यकर्ते जमा झाले आहेत. आमदार प्रवीण दरेकर, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, आशिष शेलार, आ. प्रसाद लाड, किरण पावसकर, किरीट सोमय्या यांच्या सह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, पदाधिकारी सहभागी झाल्याचे दिसून येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजमात अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या राज्यात आज लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि अवैध प्रार्थना स्थळावरील भोंग्यांनी सध्या खूप मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला आहे. हिंदू समाजाच्या मुली, महिला आज असुरक्षित झाल्या आहेत. हिंदू मुली, लव्ह जिहादला बळी पडत आहेत. मुंबईतील कॉल सेंटर मधे काम करणारी श्रद्धा वालकर हिचे आज उदाहरण आपल्यासमोर आहे. अवैध प्रार्थना स्थळावरील भोंग्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रास होतो.

यामोर्चाद्वारे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मुंबईच्या सकल हिंदू समाजातर्फे आज सकाळी दहा वाजता दादर शिवाजी पार्क येथून जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चा कामगार मैदान मार्गे प्रभादेवी येथे पोहचणार असून या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गैर प्रकार टाळण्यासाठी शीघ्र कृती दलाचे पथक देखील तैनात ठेवण्यात आले आहे.

हे ही वाचा:

माझ्या हत्येचा कट  रचला जात आहे

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”

हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडक

जेरुसलेमच्या प्रार्थनास्थळात घुसुन दहशत वाद्यांचा गोळीबार

लव्ह जिहादचे प्रकार रोखण्यात यावेत आणि धर्मांतर कायदा देशात लागू करावा, या मागणीसाठी आज मुंबईत सकल हिंदू समाजामार्फत हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय. दादर येथील शिवाजी पार्कमधून दहा वाजता मोर्चाला सुरवात होईल व कामगार मैदान येथे या मोर्चाची सांगता होईल. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कामगार मैदान परिसरात पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा