24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामावाझे यांना हटवले तर अनेक बडी नावे बाहेर येतील ही सरकारला भीती

वाझे यांना हटवले तर अनेक बडी नावे बाहेर येतील ही सरकारला भीती

Google News Follow

Related

क्राईम इंटेलिजन्स युनिटमध्ये कार्यरत असलेल्या एपीआय सचिन वाझे यांना या पदावरून हटवले तर अनेक बडी नावे बाहेर येतील अशी भीती ठाकरे सरकारला असल्यामुळे त्यांना हात लावला जात नाही असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. वाझे प्रकरणावरून भाजपाने मंगळवारी सभागृहाचे काम बंद पाडले.

विधी मंडळ अधिवेशनाचे मंगळवारचे कामकाज संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे सरकारवर त्यांनी घणाघाती टीका केली. हिरेन प्रकरणात आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मी सरकारला सांगू इच्छितो की हा घाबरणारा विरोधी पक्षनेता नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

एपीआय वाझे यांनी या प्रकरणात अनेक गोष्टी लपवल्या. मनसुख हिरेन यांच्याशी त्यांचा पूर्व परीचय होता ही माहीती त्यांनी उघड केली नाही. हिरेन यांच्या ज्या स्कॉर्पियो गाडीत स्फोटके सापडली ती गाडी वाझे यांच्या ताब्यात गेले पाच महिने होती हेही त्यांनी सांगितले नाही.

ज्या दिवशी हिरेन यांची हत्या झाली. त्या दिवशी त्यांच्या मोबाईलचे अखेरचे लोकेशन वसई येथे ज्या प्रॉपर्टीच्या जवळपास सापडले ती धनंजय गावडे या इसमाच्या मालकीची आहे. गावडे हे शिवसेनेचे नगरसेवक होते. त्यांच्यावर खंडणी आणि बलात्कारासारखे गंभीर आरोप आहेत. २०१८ पासून ते वसईतून फरार होते. २०१७ च्या एका खंडणी प्रकरणात वाझे आणि गावडे हे सहआरोपी होते. त्या दोघांनी या प्रकरणात अटक पूर्व जामीन घेतला होता अशी माहीती फडणवीस यांनी जाहीर केली.

हिरेन यांची वसईत हत्त्या करून त्यांना खाडीत फेकण्यात आले असावे अशी शक्यता फडणवीस यांनी व्यक्त केली. हाती आलेल्या माहीतीवरून वाझे यांनीच हिरेन यांची हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. सरकारने आधी त्यांना पदावरून हटवण्याचे मान्य केले होते. परंतु आता त्यांना वाचवण्यासाठी सरकारने ताकद लावलेली दिसते. वाझे यांना हटवले तर या प्रकरणामागे असलेल्या अनेक बड्या धेंडांची नावे उघड होतील अशी भीती सरकारला वाटत असावी. 

वाझे क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख असून पदाचा दुरुपयोग करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे त्यांना पदावर ठेवून त्यांची चौकशी होऊ शकत नाही. आयपीसी ३०२ ची चौकशी होत राहील, मात्र आयपीसी २०१ अंतर्गत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी होती. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा