22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषभारतीय संस्कृती, एकता, संरक्षण दल सज्जतेच्या दर्शनाने कर्तव्यपथ सजला

भारतीय संस्कृती, एकता, संरक्षण दल सज्जतेच्या दर्शनाने कर्तव्यपथ सजला

नारी शक्तीचेही दर्शन

Google News Follow

Related

भारताच्या ७४व्या प्रजाकसत्ताक दिनाच्या निमित्ताने कर्तव्यपथावर समग्र भारताचे दर्शन घडले. भारतात तयार करण्यात आलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, महिला शक्ती, वसाहतवादाच्या जोखडातून मुक्त झालेला भारत याचे दर्शन कर्तव्यपथावर झाले.

कर्तव्यपथावर सैन्यदलाच्या परेडआधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ त्यांनी फुले अर्पण करत शहिदांचे स्मरण केले.

राष्ट्रध्वजाला ज्या ब्रिटिशकालीन २५ पौंडर तोफांनी सलामी दिली जात असे ती प्रथा यंदा मोडित निघाली. यावेळी भारतीय बनावटीच्या १०५ एमएम भारतीय फिल्ड गन्सने २१ तोफांची सलामी दिली गेली. गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी या तोफांनी सलामी दिली होती पण प्रथमच प्रजासत्ताकदिनी या तोफांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली गेली.

इजिप्तचे पंतप्रधान अब्देल फतह एल सिसि हे यावेळी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत इजिप्त सेनेची तुकडीही भारतात आली होती. कर्तव्यपथावर परेडच्या अगदी प्रारंभी या तुकडीने परेड केली.

या परेडचे नेतृत्व अतिविशिष्ठ सेवा मेडल विजेते लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सलामी स्वीकारली.

हे ही वाचा:

बागेश्वर बाबांना नागपूर पोलिसांची क्लीन चीट

बंधुभाव आणला तर स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने होईल साकार

श्याम मानव आणि सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी माफी मागावी

बॉक्सिंग फेडरेशनने निलंबित केलेले असतानाही जय कवळी ऑलिम्पिक संघटनेत कार्यरत कसे?

तीन परमवीर चक्र विजेते जवान व तीन अशोक चक्र विजेते जवान या परेडच्या प्रारंभी गाडीतून चालत पुढे निघाले. शिवाय, प्रधानमंत्री बाल पुरस्कार विजेतेही परेडमध्ये सामील होते.

अग्निवीरांचाही सहभाग या परेडमध्ये होता. इजिप्तचे १२० सदस्यीय पथक यात परेड करत होते. भारतीय सेनादलांच्या या परेडमधून आत्मनिर्भर भारताचे दर्शन घडले. भारतीय बनावटीचे अर्जुन एम के १, के ९, वज्र, बीएमपी, ब्राह्मोस, नाग क्षेपणास्त्रे, आकाश क्षेपणास्त्र यांनीही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. वेगवान फायटिंग वेहिकल्स, १० मीटरचे छोटे पूल, मोबाईल मायक्रोवेव्ह नोड आणि मोबाईल नेटवर्क सेंटर हेदेखील या परेडशी शोभा वाढवत होते.

महिला शक्तीचे दर्शनही या परेडमध्ये घडले. लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत यांनी नौदलाच्या १४४ सदस्यांचे नेतृत्व केले. नारी शक्तीचे वाढते महत्त्व त्यातून दिसून आले. प्रथमच सीमा सुरक्षा दलाच्या उंटाचा ताफा या परेडमध्ये दिसला.

विविधतेचे दर्शन घडविणारे चित्ररथ हे या परेडचे आकर्षण होते. त्यात १७ राज्यांनी आपल्या चित्ररथांतून भारतीय संस्कृती, परंपरा दाखविल्या. महाराष्ट्राने तीन शक्तीपिठांचे महत्त्व आपल्या चित्ररथातून दाखविले.

फ्रान्समधून नुकत्याच भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट झालेल्या नऊ राफेल विमानांनी आकाशभ्रमण करून सर्वांचे डोळे दिपविले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा