27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरदेश दुनिया“माईंड रीडर सुहानी शाह यांच्यापेक्षा मी करतो ते वेगळं आहे,

“माईंड रीडर सुहानी शाह यांच्यापेक्षा मी करतो ते वेगळं आहे,

कारण…”! धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा दावा

Google News Follow

Related

सध्या सगळीकडे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत.अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून धीरेंद्र कृष्ण महाराज यांना चमत्कार सिद्ध करण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. त्यावर त्यांना नागपूर पोलिसांकडून क्लीन चीट मिळालीच आहे.धीरेंद्र महाराज यांनीही आपल्या बागेश्वर धाम मठामध्ये काही प्रात्याक्षिक दाखवून चमत्कार सिद्ध केल्याचा दावा केला आहे. यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे माईंड रीडर सुहानी शाह यांचेही काही व्हिडीओ सध्या व्हायरल होऊ लागले आहेत.

सुहानी शाह यांनीही धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्याप्रमाणेच कोणताही प्रश्न वगैरे न विचारताच त्यावरचं उत्तर आधीच लिहून ठेवण्याचं प्रात्याक्षिक एका वृत्तवाहिनीवर करून दाखवलं आहे,  सध्या हे व्हिडीओ व्हायरल होत असून आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज आणि सुहानी शाह करत असलेल्या गोष्टींची तुलना केली जात आहे. मात्र, सुहानी शाह यांच्यापेक्षा आपण वेगळे काही करत असल्याचा दावा धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी केला आहे.

नेमकं काय घडतंय?
धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज लोकांच्या मनातल्या गोष्टी आधीच ओळखत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भात त्यांचे काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. मात्र, अंनिसनं त्यांच्यावर लोकांना फसवत असल्याचा दावा केल्यापासून ते चर्चेत आले आहेत. एकीकडे हा सगळा वाद सुरू असताना दुसरीकडे सुहानी शाह यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्याप्रमाणेच एका वृत्तवाहिनीवर काही प्रात्याक्षिकं दाखवून आपणही या गोष्टी सहज करू शकत असल्याचा दावा केला आहे.

हे ही वाचा:

जाणून घ्या तुमच्या नेत्याला’

भाजपाचे मिशन मुसलमान २०२४

मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट दिले होते, पण…फडणवीस काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे भागम भागचा तिसरा भाग

मात्र, माईंड रीडर सुहानी शाह आणि आपण करत असलेल्या गोष्टी भिन्न असल्याचं धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीमध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी यावर आपले त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज?
“सुहानीला हे सगळं करण्यासाठी विचार करावा लागतो. तिनं सांगितलं की डोळे बंद करा. मनातल्या मनात जोरात त्या व्यक्तीचं तीन वेळेस नाव घ्या. त्यासाठी तिला तीन संकेत हवे असतात. तर “आम्ही आधीच कागदावर एक माहिती लिहून ठेवतो. तुम्ही हव्या त्या व्यक्तीला घेऊन या. ती माहिती त्याच व्यक्तीची असेल”, असा दावा यावर धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी केला आहे. त्यामुळे आता हा वाद हळूहळू अंनिस विरुद्ध धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज असा न राहाता आता सुहानी शाह विरुद्ध धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज असा होऊ लागल्याचं चित्र दिसत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा