25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामादुसऱ्या मित्राला भेटल्याने आफताबने हिंसक होऊन श्रद्धाची त्यादिवशी हत्या

दुसऱ्या मित्राला भेटल्याने आफताबने हिंसक होऊन श्रद्धाची त्यादिवशी हत्या

दिल्ली पोलिसांचे प्रतिपादन

Google News Follow

Related

मेहरौली हत्याकांडातील आरोपपत्र मंगळवारी साकेत न्यायालयात दाखल करण्यात आले, ज्याने आफताबची न्यायालयीन कोठडी दोन आठवड्यांनी वाढवून सात फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. आफताब पूनावाला हिंसक बनला आणि त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली श्रद्धा वालकर खुनाच्या दिवशी ती मैत्रिणीला भेटायला गेल्यानंतर तो रागावला होता असं दिल्ली पोलीसआरोपपत्रात पोलिसांनी म्हटले आहे.
६,६२९ पानांच्या आरोपपत्रात पोलिसांनी म्हटले आहे की, श्रद्धा वालकर मित्राला भेटण्यासाठी बाहेर गेल्याचे कळताच आफताब पूनावाला अत्यंत हिंसक झाला होता”घटनेच्या दिवशी श्रद्धा वालकर दुसर्‍या एका मित्राला भेटायला गेली होती जे आफताब पूनावालाला आवडत नव्हते आणि म्हणूनच त्यानंतर तो हिंसक झाला आणि ही घटना घडली,” असे सह पोलिस आयुक्त दक्षिण मीनू चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मेहरौली हत्याकांडातील आरोपपत्र मंगळवारी साकेत न्यायालयात दाखल करण्यात आले, ज्याने त्याची न्यायालयीन कोठडी दोन आठवड्यांनी आणखी वाढवून सात फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे.गेल्या वर्षी दिल्लीच्या मेहरौली येथे श्रद्धा वालकरचा तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याने खून केला होता, ज्याने तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले आणि दिल्ली शहराच्या विविध भागात फेकले. गेल्या वर्षी मे महिन्यात त्याने २७ वर्षीय श्राद्धाहत्याची केल्याचा आरोप त्याच्यावर आहे पण ही घटना काही महिन्यांनंतर उघडकीस आली. त्यानंतर त्याला गेल्या वर्षी बारा नोव्हेंबर २०२२ रोजी अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा:

टाटा एआयजीच्या व्यासपीठावर कारुळकर प्रतिष्ठानचे सांकेतिक भाषा सत्र

कुस्ती अध्यक्ष बृजभूषण प्रकरणाच्या चौकशी समितीची अध्यक्ष मेरी कोम

ठाकरेंची शिवसेना पहिल्या क्रमांकापासून ‘वंचित’

‘जन गण मन’ : राष्ट्रगीत एक अभिमान गीत

आरोपपत्रात पुढे पोलिसांनी म्हटले आहे की, आरोपींनी श्रद्धा वालकरचा मृतदेह कापण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे वापरली असून त्यांच्याकडून काही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.आफताब पूनावाला यांच्यावर आयपीसीच्या कलम ३०२ अंतर्गत हत्या आणि कलाम २०१ अंतर्गत गुन्ह्याचा पुरावा गायब करणे असे आरोप ठेवण्यात आले होते आणि आरोपपत्रानुसार, केस मजबूत करण्यासाठी १५० लोकांच्या साक्षी आत्तापर्यंत नोंदवण्यात आल्या आहेत.पोलिसांनी सांगितले की त्यांनी मोबाईल फोन, लॅपटॉप, कॅमेरे, कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि जीपीएस लोकेशन्ससह अनेक डिजिटल पुरावे तपासले होते.

“आमच्याकडे परिस्थितीजन्य पुरावे आहेत. आमच्याकडे तोंडी साक्ष आणि डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे सुद्धा आहेत. ज्या सर्व चाचण्या घेतल्या गेल्या त्या आमच्या तपासाला समर्थन देतात,” असे संयुक्त पोलिस आयुक्तांनी सांगितले

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा