22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरदेश दुनियाराष्ट्रीय बालिका दिन; मुलींच्या कर्तृत्वाला समर्पित दिवस

राष्ट्रीय बालिका दिन; मुलींच्या कर्तृत्वाला समर्पित दिवस

मुलींच्या उज्वल भविष्यासाठी

Google News Follow

Related

आज २४ जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवसाचे औचित्य साधून परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी ट्विट करत आत्तापर्यंत ज्या महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे,त्यांना शुभेच्छा देऊन उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्हाला जर मुलगी असेल तरच तुमचे भविष्य सफल आहे, खरच कन्या किंवा मुलगी ह्या आपल्याला एखाद्या भेटवस्तूपेक्षा कमी नाहीत. पण अनेकदा लोक ही गोष्ट विसरतात आणि लहान मुलींना लिंगाच्या आधारावर भेदभावाचे बंधन घालायला लावतात. पण, बदलत्या काळानुसार परिस्थितीमध्ये अनेक सकारात्मक बदल झाले आहेत.

ज्यामध्ये सरकारचाही मोठा सहभाग आहे.  देशाच्या मुलींना उज्ज्वल भविष्य, यशस्वी जीवन आणि उत्तम शिक्षण देण्यासाठी उद्याची खात्री देण्याचा सतत प्रयत्न करत असतात अशा मुलींच्या सन्मानार्थ, ‘राष्ट्रीय बालिका दिन’ आपण दरवर्षी २४ जानेवारीला साजरा करतो. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या या दिवसाचे मूळ उद्दिष्ट म्हणजे मुलींना भरपूर आधार आणि उत्तमोत्तम संधी उपलब्ध करून देणे हाच असून मुलींच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार आणि संपूर्ण देश वेगाने पावले उचलत आहे.

राष्ट्रीय बालिका दिनाचे महत्त्व
भारतीय समाजात स्त्री भ्रूण हत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राष्ट्रीय बालिका दिनाची सुरुवात करण्यात आली. लिंगनिश्चितीसाठी मुलींना गर्भातच मारण्याचे वाढते प्रकार थांबवणे हा उद्देश आहे. २००३ मध्ये भारत सरकारने लिंग निर्धारण प्रक्रियेवर पूर्णपणे बंदी घातली आहे. मुलींच्या चांगल्या भवितव्यासाठी सरकारने मुलींच्या शिक्षणाला अधिक महत्त्व देण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर मुलींच्या शिक्षणासाठी सरकारकडून आर्थिक मदतही केली जाते. त्यानुसार मुलींच्या प्राथमिक शिक्षणाचा खर्च सरकार उचलते.

मुलींचे शिक्षण हे नेहमीच लिंगाच्या आधारावर भेदभावाच्या चौकटीत असते. त्यामुळेच सरकारने मुलींच्या शिक्षणाच्या क्षेत्रात उचललेली पावले अत्यंत महत्त्वाची आहेत.आज सरकार मुलींच्या फायद्यासाठी शाळा आणि महाविद्यालयीन शिष्यवृत्ती, आरोग्य सेवा आणि आर्थिक सेवा प्रदान करते. शाळा, महाविद्यालयांपासून ते सरकारी आणि खासगी नोकऱ्यांमध्ये मुलींसाठी जागा राखीव ठेवलेल्या असतात  जेणेकरून अशा संस्थांमध्ये मुलगा मुलगी हा भेद भाव पुसून टाकता येईल.

राष्ट्रीय बालिका दिनाचे महत्व काय 
२४ जानेवारी हा दिवस मुलींवरील सर्व अत्याचारांची जाणीव करून देतो. त्यांच्याविरोधात आवाज उठवण्याचाही प्रयत्न करतो. जेणेकरून देशातील मुलींची स्थिती सुधारेल. शासनाने राबविलेल्या मोहिमांमुळे आज महिलांच्या शिक्षण आणि आरोग्याच्या पातळीवर सकारात्मक बदल झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा