23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणमाजी आरोग्य मंत्री दीपक सावंत जखमी; आणखी एका नेत्याला अपघात झाला!

माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत जखमी; आणखी एका नेत्याला अपघात झाला!

अपघात मालिका सुरूच

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या कारला आज शुक्रवारी सकाळी काशिमिरा येथे महामार्गावर अपघात होऊन त्यांच्या मानेला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. काशिमिरा येथील सगनाई नाक्याजवळ सकाळी साडेअकराच्या सुमारास एका भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने सावंत यांच्या कारला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला असून डंपर चालकाला काशिमीरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सावंत हे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील सावर्डे गावाकडे जात असताना दोन आठवड्यांच्या अंतरात कुपोषणामुळे अलीकडेच दोन अर्भकांचा मृत्यू झाला होता.म्हणून विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात पालघरला अधिकाऱ्यांशी चर्चा करायला जात असताना काशिमीरा भागात त्यांच्या कारला डंपरने धडक दिली या मुळे दीपक सावंत जखमी झाले आहेत. अंधेरीतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दीपक सावंत यांनी रुग्णालयात धाव घेतली

ड्युटीवरील वाहतूक कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. सावंत यांनी स्वत:ला अंधेरीतील रुग्णालयात दाखल करणे पसंत केले,असे काशिमीरा पोलिस स्टेशन च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या अपघातात सावंत यांच्या गाडीच्या मागील भागाचे पूर्ण नुकसान झाले आहे. दरम्यान,पुढील तपास सुरू असून डंपरचा चालक इर्शाद खान याला ताब्यात घेण्यात आल आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब

जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण

महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक

कोण आहेत दीपक सावंत?

दीपक सावंत हे विधानपरिषदेचे माजी सदस्य आहेत. शिवसेनेकडून त्यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. जुलै २००४ मध्ये त्यांची पहिल्यांदा विधानपरिषदेवर वर्णी लागली. त्यानंतर २००६ आणि २०१२ मध्ये ते पुन्हा निवडून आले. मात्र त्यांना तिसऱ्या वेळी तिकीट नाकारण्यात आले होते डिसेंबर २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात दीपक सावंत त्यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते.त्याचवेळी त्यांच्याकडे भंडारा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

महाराष्ट्रातील या सहा नेत्यांचा अपघात

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात बच्चू कडू, योगेश कदम, जयकुमार गोरे, धनंजय मुंडे या आमदारांचा थोड्या दिवसांच्या अंतराने भीषण अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यापैकी योगेश कदम यांना कशेडी घाटात झालेल्या अपघातामध्ये सुदैवाने फारशी दुखापत झाली नव्हती. मात्र धनंजय मुंडे आणि बच्चू कडू यांना बऱ्यापैकी दुखापत झाल्याने या दोघांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तीन आमदारांच्या अपघाताआधीही भरत गोगावले, जयकुमार गोरे या आमदारांच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात ते थोडक्यात बचावले होते. मागील वर्षी विनायक मेटे यांचं रस्ता अपघातात दुर्दैवी निधन झालं होतं. यापैकी अनेक घटना रात्रीच्या वेळी घडल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा