25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामाहाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्की जागतिक दहशतवादी म्हणून घोषित

हाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्की जागतिक दहशतवादी म्हणून घोषित

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची घोषणा

Google News Follow

Related

पाकिस्तान स्थित दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. लष्कर ए तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याचा हा मेहुणा आहे.

भारताने पाकिस्तानात स्थिरस्थावर झालेल्या दहशतवाद्यांची यादी संयुक्त राष्ट्रात असताना तयार केली होती. २०२२मध्ये भारताने पाच दहशतवाद्यांची यादी संयुक्त राष्ट्रांकडे सादर केली होती. त्यात अब्दुल रहमान मक्की (एलईटी), अब्दुल रौफ असगर (जैश ए मोहम्मद), साजिर मिर (एलईटी), शाहिद मेहमूद (एलईटी) आणि तलहा सईद (एलईटी) यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

सामनाच्या संपादकपदी रामसे ब्रदर्स?

पदयात्रेत राहुल गांधींच्या गळ्यात एकाने घातले हात

पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब

भारत आणि अमेरिकेच्या वतीने मक्कीविरोधात संयुक्त प्रस्ताव ठेवला होता. त्याला चीनने विरोध दर्शविला होता पण नंतर चीनने आपला विरोध मागे घेतला आणि मक्कीचे नाव जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट झाले.

भारताने या निर्णयाचे स्वागत केले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि अल कायदा निर्बंध समितीने अब्दुल रहमान मक्की याचा जागतिक दहशतवादी म्हणून समावेश केल्याबद्दल अभिनंदन. मक्की हा एलईटीचा म्होरक्या होता आणि संघटनेसाठी निधी उभा करण्याचे काम करत आहे.

बागची म्हणाले की, या विभागातील दहशतवादी संघटनांकडून मिळणाऱ्या धमक्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांना लगाम घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या समितीकडून दहशतवादी घोषित करणे आवश्यक असते. त्यातून त्यांचे दहशतवादाचे जाळे उद्ध्वस्त करता येते. भारत हा दहशतवादाविरोधात कायम आग्रही राहिलेला आहे. यापुढेही भारत आंतरराष्ट्रीय समुदायांना दहशतवादाविरोधात पुढाकार घेण्यास भाग पाडेल.

६८ वर्षीय मक्कीचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील बहवालपूर येथे झालेला आहे. लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा तो मेहुणा आहे. जमात उल दावाचा तो दुसऱ्या क्रमांकाचा नेता आहे. हाफिज सईदचा मुंबईतील स्फोटांमध्ये सहभाग होता.

तरुणांना दहशतवादाकडे वळवणे, त्यासाठी निधी गोळा करणे असे काम मक्की करतो. भारतात विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये दहशत निर्माण करण्याचे काम तो करत असतो. काश्मीर पाकिस्तानला सोपवला जात नसल्याबद्दल मक्कीने २०१०मध्ये भारतात रक्ताचे पाट वाहतील अशी धमकी दिली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा