राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न आपल्या शिवबाकडून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवलं, जर जिजामाता नसत्या तर कदाचित हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलंच नसतं.
बारा जानेवारी हा दिवस अख्ख्या महाराष्ट्राला लाभलेला सोनेरी दिवस आहे.या दिवशी राजमाता जिजाऊ यांची जयंती राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांना आणि त्यांच्या कार्याला अभिवादन केले जाते.
आज जिजाऊंची ४२५ वी पुण्यतिथी
माँसाहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथेझाला.सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील, तर आईचे नाव म्हाळसाबाई होते.जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.शहाजीराजे भोसले हे वेरूळ येथील मालोजी भोसले यांचे पुत्र होते. जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये झाला.
असं म्हणतात आई म्हणजे प्रेम, आपुलकी, प्रेरणा, संयम आणि सामर्थ्य यांचा संगम आणि या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे स्वराज्य जननी जिजाऊबाई शहाजीराजे भोसले. माँसाहेबांचा उल्लेख करताना कुठल्याही संदर्भाची गरज पडत नाहीनिजामशाही आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय बिकट होती. त्यांच्या विरुद्ध एक शब्द काढायची हिम्मत कोणामध्ये नव्हती. या जुलमी सत्तेच्या बंधनातून रयतेची सुटका करावी असे जिजामातांना सतत वाटे. म्हणूनच त्यांनी आपल्या शिवबाला अशा बिकट परिस्थिती त स्वराज्य निर्मितीचे स्वप्न दाखविले आणि अखंड मेहनत घेऊन माँसाहेबांच्या मदतीने सत्यात उतरवले.
राजमाता जिजाऊसाहेब यांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवराय यांना सद्गुणाचे बाळकडू तर पाजलेच पण साहस आणि पराक्रमाची शिकवण दिली. जीवनाचे ध्येय एकच म्हणजे पारतंत्र्यात असणाऱ्या लोकांना स्वातंत्र्य आणि स्वराज्य मिळवून देणे अशीच राजमातानी शिकवण शिवरायांना दिली होती.शिवाजीराजे १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली.अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली.
हे ही वाचा:
आरेनंतर आदित्य यांची रेसकोर्ससाठी हाळी?
महाराष्ट्रातही समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करा!
…मग शरद पवार कृषिमंत्री होते की आयपीएलचे कारभारी
म्हाडा टेंडरच्या वादातून कुर्ल्यात गाडीवर केला गोळीबार
कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले आणि उद्ध्वस्त झालेले पुणे, दिमाखात वसवून त्याला नावलौकिक प्राप्त करुन दिले. जिजाऊंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवाजीमहाराज घडले. जिजाऊंनी लहानपासून आपल्या शिवबाला गोष्टीच सांगितल्या नाहीत तर स्वराज्य हे सुराज्य चालवण्याचे लहानमोठे धडे प्रत्यक्ष विविधप्रकारचे शिक्षण देऊन शिवरायांना दिले.
राजमाता जिजाऊंच्या शिकवणीच्या आणि संस्काराच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी हजार वर्षाची गुलामगिरी मोडून काढली आणि राजमाता जिजाऊ यांचे स्वप्न साकार करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.आजच्या दिवशी राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा.