मुंबईत एटीएम मधून रोकड काढण्यासाठी एटीएमच्या कियोस्क यंत्रामध्ये सन्मयका आणि गोंदाचा वापर करून ग्राहकांची फसवणूक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे
एटीएम किऑस्कमध्ये ग्राहकांना फसवण्याची एक नवीन पद्धत दिसून आली आहे. चलनी नोटांचे वितरण तात्पुरते रोखण्यासाठी यंत्रावरील रोख वितरण स्लॉटवर संन्माईकाचा छोटा तुकडा चिकटवल्याबद्दल एका 26 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. जेव्हा कधी एखाद्या ग्राहकाने रोख पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयन्त अयशस्वी व्हायचा , आरोपी कियॉस्क यंत्र सोडण्याची वाट बघत असे आणि यंत्रामधून त्याचे पैसे घेत असे. पवन कुमार पासवान या २६ वर्षीय व्यक्तीला अलर्ट बीट मार्शलने दफ्तरी रोड, मालाड पूर्व येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये रंगेहात पकडले आहे.पासवानने इतर बँकांच्या एटीएमलाही फसवले असून यात अनेक बँक ग्राहकांची फसवणूक झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
काय आहे प्रकरण
बीट मार्शल रामदास भूरडे हे मालाड पूर्व येथे चार जानेवारीला गस्त घालत असताना तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितले की, दफ्तरी रस्त्यावरील एका एटीएम मधून एक माणूस सारखा आत बाहेर करत आहे आणि त्या परिसरांत अजूनही तो बराच वेळ आहे तेव्हा त्वरित भूरडे यांनी त्या एटीएमवर पाळत ठेवून त्या व्यक्तीला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे नऊ सनमाईकाच्या पट्ट्या, गोंदाच्या बाटल्या आणि रोख दोन हजार रुपये आढळून आले. त्यानंतर त्याची पासवान अशी ओळख पटली.
हे ही वाचा:
आरेनंतर आदीत्य यांची रेसकोर्ससाठी हाळी…
धनुष्यबाण कुणाचा हे ठरवणारे मुद्दे येतायत समोर
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी, आयकरचे २० अधिकारी; छापासत्र सुरू
विराट भन्नाट… श्रीलंकेविरुद्ध ठोकले वनडेतील ४५ वे शतक
कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने फिक्या रंगाच्या सनमाईकाच्या पट्ट्या बनवून आणल्या आणि कमी वर्दळ असेल अशीच एटीएम तो शोधत होता, असे पोलिसांनी सांगितले. दिंडोशी पोलीस निरीक्षक गजानन पाटेकर यांनी सांगितले की, ग्राहक एटीएम मध्ये जाण्याआधी तो सनमाइका कॅश डिस्पेंशन स्लॉटला लावून चिकटवायचा,पण ग्राहकाला काही चिकटले आहे याची खबरच नसायची. ग्राहकाने पैसे काढल्यावर बँकेचा मेसेज येत असे पण रोख मिळत नसे , तांत्रिक बिघाड समजून ग्राहक निघून गेल्यावर पासवान नंतर चिकटलेली रोख रक्कम काढून घेत आणि परत दुसऱ्या ग्राहकासाठी सनमाईका चिकटवून ठेवत असे.
ग्राहकांची किती प्रमाणात फसवणूक झाली आहे यासाठी आम्ही बँकांना पत्र लिहीत आहोत ,विरारला राहणाऱ्या पासवानवर यापूर्वीही घरफोडीचा गुन्ह्या दाखल आहे. बीटमार्शल भूरडे यांचा सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी या दक्षतेबद्दल सत्कार केला आहे.