माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासोबतच ग्रामविकास खात्याचे सचिव राजेश कुमार मिना यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. एकूण 158 कोटींचा घोटाळा हसन मुश्रीफ यांनी केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुश्रीफांना वाचवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे सरकारने केल्याचा दावाही किरीट सोमय्यांनी केला आहे.
विविध साखर कारखान्यांमध्ये घोटाळे झाले आहेत आणि हे सर्व घोटाळे इंटरलिंक आहेत, असं सोमय्यांचं म्हणणं आहे. केवळ हसन मुश्रीफच नाही तर अनिल परबही आहे आणि त्यानंतर अस्लम शेख यांचा नंबर लागणार अशीही स्पष्टोक्ती किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.
काय आहे प्रकरण ?
कोल्हापुरातील अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचाराचे हे प्रकरण असून या कारखान्यातील 98 टक्के पैसा हा मनी लाँडरींगच्या माध्यमातून जमवला आहे १५८ कोटीचे पुरावे आम्ही दिले असून एकूण १५०० कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आलाय.
या घोटाळ्यात मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांचा प्रमुख सहभाग असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना काही वर्षांपूर्वी नुकसानीत काढण्यात आला होता. हा कारखाना बिस्क इंडिया कंपनीला विकण्यात आला.विशेष म्हणजे बिस्क इंडिया कंपनी ही हसन मुश्रीफ यांचे जावाई मतीन मंगोली यांच्याच मालकीची आहे. या व्यवहारासाठी कलकत्ता येथील बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने बोगस खाती तयार करण्यात आली होती.
हे ही वाचा:
आरेनंतर आदित्य यांची रेसकोर्ससाठी हाळी?
महाराष्ट्रातही समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करा!
…मग शरद पवार कृषिमंत्री होते की आयपीएलचे कारभारी
म्हाडा टेंडरच्या वादातून कुर्ल्यात गाडीवर केला गोळीबार
या बोगस खात्यांमध्ये टाकलेले पैसे मतीन मंगोली यांच्या बिस्क इंडिया कंपनीत वळते करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बिस्क इंडिया कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा अजिबात अनुभव नाही,पण कंपनीला हा साखर कारखाना हस्तांतरीत करण्यात आला, यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेने योग्य लिलाव केला नाही,असा आरोप आहे.
कारखाना हस्तांतरीत करण्यासाठी केवळ बिस्क इंडिया कंपनीच हीच का निवडली असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी केला होता. मुश्रीफ आणि त्यांचे जावई यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.