हसन मुश्रीफ यांनी ही कारवाई म्हणजे ठराविक जातीधर्माच्या लोकांवरील कारवाई आहे, असा गंभीर आरोप केला आहे. मुश्रीफ हे सध्या कोल्हापूरला नाहीत. आपण कामानिमित्त बाहेर आहोत असे सांगत त्यांनी व्हीडिओच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की, माझ्यावर यापूर्वीही कारवाई झाली होती पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नव्हते मग आता ही कारवाई कसली आहे. पण मी या कारवाईला सामोरा जाईन. यासाठी कार्यकर्त्यांनी बंद किंवा आंदोलनाचे हत्यार उपसू नये. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.
हे ही वाचा:
आरेनंतर आदीत्य यांची रेसकोर्ससाठी हाळी…
धनुष्यबाण कुणाचा हे ठरवणारे मुद्दे येतायत समोर
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी, आयकरचे २० अधिकारी; छापासत्र सुरू
विराट भन्नाट… श्रीलंकेविरुद्ध ठोकले वनडेतील ४५ वे शतक
हसन मुश्रीफ यांच्या घरावर ११ तारखेला पहाटेपासून ईडी आणि आयकर खात्याची कारवाई सुरू झाली आहे. त्यांचे नातेवाईक तसेच व्यावसायिक भागीदारांच्या घरीही ईडी आणि आयकर खात्याचे अधिकारी पोहोचले. त्यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप आहेत. आपल्या जावयाला आर्थिक लाभ मिळवून दिल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली की, आता त्यांनी धर्म आठवला. मी जेव्हा कोल्हापूरला गेलो तेव्हा मला अडविण्यात आले. गरीबांना लुटताना त्यांना धर्म आठवला नाही का, त्यांच्या खात्यात जे पैसे आले, गरीब शेतकऱ्यांना लुटताना धर्म आठवत नव्हता.
मुश्रीफांनी जावयाला १५०० कोटींचे कंत्राट दिले, असा आरोपही सोमय्या यांनी केला.
मुश्रीफ यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात खळबळ उडाली असून कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमू लागले आहेत. त्यांनी या कारवाईचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे. घोषणाबाजी सुरू आहे.