चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा रौद्र अवतार दाखवला आहे. बीजिंग, शांघायसह अनेक भागात कोविड रुग्णात वाढ होतानाचे चित्र आहे. कोरोनाचा आलेख वाढता असूनदेखील चीनने कोरोनाचे निर्बंध उठवले आहेत. शवगृहात बघावं तिकडे मृतांचा खच पडलेला आहे. चीनमधील कोरोनाचा महासंकट भारत, जपान, थायलंड आणि अमेरिकेकडेही वळलं आहे. अशातच चीनची बेपर्वाई पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.
चीनने यावेळी सर्व सीमा पार केल्या आहेत. चीनने तीन वर्षांहून बंद केलेल्या सर्व सीमा खुल्या केल्या आहेत. रविवारी हाँगकाँग आणि मुख्य भूप्रदेश चीन दरम्यान प्रवाशांनी स्थलांतरनही केले. धोकादायक म्हणजे या प्रवाशांना क्वारंटाइन देखील केलेले नाही, त्यांची ही प्रक्रिया रद्द केली. चीनच्या या बेफिकीरीमुळे भारतासह अमेरिका, जपान, थायलंड या देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका निर्माण झालाय.
हा निर्णय चीनने का घेतला?
चीनच्या या निर्णयामागे २१ जानेवारीपासून चंद्र नववर्ष सुरू होणार आहे. या ४० दिवसांमध्ये पूर्ण चीनमध्ये सार्वजनिक सुट्टी असते. या सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी चीनी लोक पर्यटनवारी करतात. एकीकडे कोरोनाचा हाहाकार सुरू असताना या दिवसांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात प्रवास करतील. त्यामुळे जगभरात कोरोना संसर्गाचा प्रसार वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :
आम्ही तुझ्या सगळ्या ऍलर्जीवर उपचार करू!
सर्वोच्च न्यायालयात आज या दोन मोठ्या प्रकरणांवर सुनावणी
म्हणून राहुल गांधी यांना थंडी वाजत नाही
चीनची कोरोना बळींची संख्या हजारो पार गेली आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांग लावावी लागतेय. चीनच्या निर्णयांमुळे जग पुन्हा एकदा जग कोरोनाच्या विळख्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे्. गेल्या आठवड्यात भारतात कोरोनाचे १ हजार ३७७ नवीन रुग्णांची नोंद झाली होती आणि १६ जणांनी आपला जीव गमावलेला आहे.