भारत जोडो यात्रेत भर कडाक्याच्या थंडीमध्ये राहुल गांधी भराभरा चालत आहेत. हात उंचावून सगळ्यांना अभिवादन करत आहेत. त्यांच्याबरोबरचे स्वेटर घालून चालत आहेत. पण राहुल गांधी मात्र थंडीची कोणतीही तमा न बाळगता पांढरा झक्क टीशर्ट आणि पातळ पँट परिधान करून भराभरा चालत आहेत . या दृश्याने भल्याभल्याना बुचकळ्यात टाकले. किंबहुना काही काळ तर त्याचे कौतुकही झाले. त्यांना याबाबत विचारणाही झाली. राहुल गांधी म्हणाले, मुझे थंड से डर नही लगता . पण या डर नही लगता मागील राज आता समोर आले आहे . पण नेटकऱ्यांनी मात्र टीशर्टचे गुपित उघडे केल्यावर मात्र राहुल गांधी याना आता नक्कीच कापरे भरलेले असणार.
एवढ्या गारठ्यातही त स्वेटर, कानटोपी काहीही न घालता राहुल गांधी कसे चालू शकतात यावरून त्यांच्या तंदुरुस्तीवरून सोहळा मीडियावर खूप चर्चा रंगली होती. काँग्रेसने तर जो मौसम बदलने निकला है… उसे बदला हुआ मौसम क्या खाक बदलेगा.. असे म्हणत भारत जोडो यात्रेच्या ट्विटर हँडलवरून राहुल गांधींच्या यात्रेचे व्हिडिओ शेअर केले होते. टीशर्टवरून सोशल मीडियावर जिनको थंड नही लगती इनको पीएम बनाओ असेही सुचवले होते. थंडी वाजत नाही खाता काय अशी विचारणा झाली.
पण आता राहुल गांधी यांना थंडी वाजत नाही याचे कारण समजले आहे. राहुल गांधी टीशर्टच्या आत थर्मल स्वेटर घालतात की काय, असा सवाल आता नेटकरी विचारू लागले आहेत. नेटकाऱ्यानी त्याचा नुसता स्वेटरवरचा फोटो आणि थर्मल घातलेला फोटो शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.
हे ही वाचा:
सानिया मिर्झाचा टेनिसला अलविदा
संजय राऊत तु जिथे बोलावशील तिथे यायला मी तयार
‘द रेझिस्टन्स फ्रंट’ दहशतवादी संघटनेवर बंदी
सोशल मीडियावर थर्मलची चर्चा रंगली आहे. भाजपने देखील राहुल गांधी यांच्यावर यावरून निशाणा साधला आहे. राहुल गांधीही आपल्याला थंडी वाजत नसल्याचे सांगत असले तरी आता भाजप नेत्यांचे ट्विट राहुल गांधींच्या टी-शर्टचे सत्य सांगत आहेत. या चित्रात राहुल गांधी टी-शर्टच्या आत उबदार पोशाख परिधान केलेले दिसत आहेत. उत्तर भारतातील नागरिक हे कपडे सहसा थंड वातावरणात घालतात, पण राहुल गांधी त्यांच्या टी-शर्टच्या मानेला बटण लावून ते लपवतात. पण आता भाजप नेत्यांच्या ट्विटमध्ये सत्य व्हायरल होत आहे.
ट्विटरवर फोटो शेअर करत भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी लिहिले, ‘ स्लीव्हलेस थर्मल आणि बटणे लावलेले टी-शर्ट घालून खोटे बोलणार्यांचा खोटेपणा उघड झाला आहे. @RahulGandhi… हिवाळ्यात थंडी वाजणे सामान्य आहे! खोट्या प्रचारासाठी लक्ष वेधण्यासाठी ही नौटंकी आहे.
The cat is out of the bag! The sleeveless thermal & buttoned up T Shirt exposes the fake narrative of liar @RahulGandhi.
Feeling cold in winter is normal! It was nothing but an attention seeking gimmick for fake publicity. pic.twitter.com/jrJuiOWkNZ— Manjinder Singh Sirsa (@mssirsa) January 7, 2023