आज सोलापुरा दौऱ्यावर असलेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा उर्फी जावेद प्रकरणावर आक्रमक भूमिका मांडली आहे.तसेच महिला आयोगाच्या अध्यक्ष्य रुपाली चाकणकर यांना पुन्हा एकदा ललकारलं आहे.
आजच्या सोलापूरच्या पत्रकार परिषदेत वाघ म्हणाल्या कि, खुल्या समाजात उघडा नंगानाच , सार्वजनिक जागांवर स्वैराचार याविरोधातील माझा लढा सुरूच राहणार. आपण समाजाचं देणं लागतो, हे कोणीही कधीही विसरू नये. कर्तव्य म्हणून जबाबदारी मिळते ती जाणीव राखून टिकवायची असते. कर्तृत्व हे शाब्दिक नाही तर कृतीनेच असायला हवं.” असं ट्विट सुद्धा त्यांनी या प्रकरणावर केले आहे.
खुल्या समाजात उघडा नंगानाच सार्वजनिक जागांवर स्वैराचार याविरोधातील माझा लढा सुरूच राहणार
आपण समाजाचं देणं लागतो हे कोणीही कधीही विसरू नये
कर्तव्य म्हणून जबाबदारी मिळते ती जाणीव राखून टिकवायची असते
कर्तृत्व हे शाब्दिक नाही तर कृतीनंच असायला हवं….(१/३)
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 8, 2023
आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली होती.या नोटिशीला चित्रा वाघ यांनी जाहीर उत्तर दिले आहे. आयोगाचा मी कायम सन्मान करते.दिलेली नोटीस जशी जाहीर केली तसंच उत्तरही सार्वजनिक करायला माझी हरकत नाही स्वैराचाराला लगाम घालणं, ही फक्त माझीच जबाबदारी नाही तर कायद्यानं स्थापित झालेल्या महिला आयोगाचीही आहेच.माझा लढा सुरूच राहणार,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.उर्फी जावेद प्रकरणावर आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित केलेत.
हे ही वाचा:
बावनकुळेंविषयी केलेले ट्विट आव्हाड यांनी केले डीलिट; औरंगजेबाची कबर असल्याचा केला होता दावा
पोस्टरवरच्या अंगप्रदर्शनाला आक्षेप घेणारा महिला आयोग उर्फीबाबत गप्प?
अयोध्येत उभे राहणार ‘महाराष्ट्र भवन’
काँग्रेसला भगव्या रंगाचा इतका तिरस्कार का?
फक्त अध्यक्ष म्हणजे महिला आयोग नाही,त्यामध्ये सदस्य असतात,त्यामध्ये राज्याचे पोलीस संचालक पण सदस्य असतात, चाकणकरांनी कुणाशी बोलून नोटीस पाठवली की आपली आपण पाठवली ह्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे.असे चित्रा वाघ रुपाली चाकणकरांना उद्देशून म्हणाल्या.