23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारण२०२४ पर्यंत सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी देश नक्षलवादमुक्त

२०२४ पर्यंत सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी देश नक्षलवादमुक्त

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला विश्वास

Google News Follow

Related

विकास आणि सुरक्षेच्या आघाड्यांवर केंद्र सरकारने उचललेल्या पावलांमुळे माओवादग्रस्त भागात नक्षलवादाच्या घटना कमी झाल्या आहेत , केंद्रात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यापासून नक्षलवादी घटनांमध्ये घट झाली आहे. नक्षलग्रस्त भाग नक्षलवादमुक्त करण्याच्या टोकाला आपण पोहोचलो आहोत.

२०२४ पर्यंत सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी देश नक्षलवादमुक्त होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. छत्तीसगडच्या कोरबा शहरात एका सभेत मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहमंत्री शहा म्हणाले, २०१४ मध्ये केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून नक्षलवादी घटनांमध्ये घट झाली आहे.

२००९ मध्ये देशात नक्षलवादाच्या २,२५८ घटना घडल्या होत्या ज्या २०२१ मध्ये त्या ५०९ वर आल्या आहेत. २०२४च्या निवडणुकीपूर्वी देश नक्षलवादमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न असेल. युवक ज्या भागात शस्त्रे उचलत असत, त्या भागात रोजगाराची साधने वाढली. तिथे टेलिफोन लाईन दिल्या, तिथे शाळा दिल्या, तिथे रस्ते दिले.असेही शहा म्हणाले.

हे ही वाचा:

सानिया मिर्झाचा टेनिसला अलविदा

आता आधार संजयबाबा बंगालींचा…

संजय राऊत तु जिथे बोलावशील तिथे यायला मी तयार

‘द रेझिस्टन्स फ्रंट’ दहशतवादी संघटनेवर बंदी

या वर्षाच्या अखेरीस छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . २०२४मध्ये नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान म्हणून पाहायचे असेल तर भाजपला मतदान करा, असे आवाहन यावेळी केले. छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारवर निशाणा साधत शहा म्हणाले, त्यांनी भ्रष्टाचाराचे काम केले. राज्यातील बलात्कार आणि गुन्हेगारीच्या घटना वाढविण्याचे काम त्यांनी केले असून आदिवासी जंगले तोडण्याचे व स्वच्छ करण्याचे काम केले असल्याचा आरोप त्यांनी केला.२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान करून काँग्रेसला धडा शिकवण्याचे आवाहन शहा यांनी केले

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा