पुढील आठवड्यात भारतीय दिवस साजरा करण्यात येणार आहे. इंदूर येथे होणाऱ्या १७ व्या प्रवासी भारतीय दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधानाच्याहस्ते एका टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. सुरक्षित, कायदेशीर, सुव्यवस्थित आणि कार्यक्षम स्थलांतराचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘गो सेफ, गो ट्रेन्ड’ या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अध्यक्ष म्हणून उपस्थित असतील.
‘भारताच्या प्रगतीतील प्रवासी अमृत काळ विश्वसनीय भागीदार’ अशी प्रवासी भारतीय दिवसाच्या परिषदेची थीम आहे. सुमारे ७० विविध देशांतील ३,५०० पेक्षा जास्त परदेशी सदस्यांनी परिषदेसाठी नोंदणी केली आहे. परिषदेचे तीन विभाग असतील. युवा प्रवासी भारतीय दिवस ८ जानेवारी रोजी युवा भारतीय दिवसाचे उदघाटन करण्यात येणार आहे.युवा प्रवासी भारतीय दिवसाला ऑस्ट्रेलियाच्या खासदार जेनेता मस्करेन्हास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ९ जानेवारी रोजी परिषदेचे उद्घाटन होईल प्रजासत्ताक गयानाचे अध्यक्ष डॉ.मोहम्मद इरफान अली हे प्रमुख पाहुणे म्हणून परिषदेला संबोधित करतील आणि विशेष पाहुणे म्हणून सुरीनाम प्रजासत्ताकचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी उपस्थित राहणार आहेत.. त्याच बरोबर टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात येईल. १० जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार २०२३ प्रदान करतील आणि समारोप सत्राचे अध्यक्षस्थान भूषवतील .
हे ही वाचा:
बावनकुळेंविषयी केलेले ट्विट आव्हाड यांनी केले डीलिट; औरंगजेबाची कबर असल्याचा केला होता दावा
पोस्टरवरच्या अंगप्रदर्शनाला आक्षेप घेणारा महिला आयोग उर्फीबाबत गप्प?
अयोध्येत उभे राहणार ‘महाराष्ट्र भवन’
काँग्रेसला भगव्या रंगाचा इतका तिरस्कार का?
प्रवासी भारतीय संमेलन चार वर्षांनंतर आयोजित केले जाते आणि कोविड महामारीच्या सुरुवातीनंतर पहिल्यांदाच आयोजित केले जात आहे. त्यामुळे इंदूर येथे होत असलेले १७ वे प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन महत्त्वपूर्ण आहे . २०२१ मधील शेवटचे प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन महामारीच्या काळात आयोजित करण्यात आले होते.