28 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरक्राईमनामाआता आळंदीत घुसले धर्मांतर करणारे, तुमचा धर्म सोडा, येशूला पूजा!

आता आळंदीत घुसले धर्मांतर करणारे, तुमचा धर्म सोडा, येशूला पूजा!

अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांविरोधात पुण्याच्या पिंपरी आणि आळंदी मध्ये गुन्हा दाखल

Google News Follow

Related

‘तुमचा धर्म सोडून येशूची पूजा करण्याचे आवाहन’ करण्याचा पुण्यातील धर्मपरिवर्तनाचा व्हिडिओ सध्या सगळीकडे वायरल होत आहे.

द्राक्षाचे पाणी ग्लासात ठेवून आणि ते येशूचे रक्त आहे असे दाखवणारे तिघे जण त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते. या तिघांविरुद्ध पुण्याच्या पिंपरी आणि आळंदी मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत असून अजून यांत कोणालाही अटक करण्यात आली नाही.

पुण्यातील आळंदी परिसरातील एका कुटुंबाला जबरदस्ती करून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केले आहे या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तुमचा हा देव काही कामाचा नाही तुमचा देव तुमचे रोग सुद्धा बरे करू शकत नाही. त्यांचे तुम्ही लावलेले हे फोटो काढून टाका,फेकून द्या. हे घ्या फक्त येशूची पूजा करा. येशूच्या प्रार्थनेत अफाट शक्ती आहे, तुमच्या देवांची उपासना करण्यापेक्षा येशूची प्रार्थना खूप शक्तिशाली आहे असं सांगून धर्म परिवर्तनाचा जबरदस्तीने प्रयत्न करणाऱ्या सुधाकर सूर्यवंशी नावाच्या व्यक्तींसह आणखी तीन व्यक्तींविरोधात आळंदी पोलीस ठाण्यांत एफ आय आर दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

बावनकुळेंविषयी केलेले ट्विट आव्हाड यांनी केले डीलिट; औरंगजेबाची कबर असल्याचा केला होता दावा

पोस्टरवरच्या अंगप्रदर्शनाला आक्षेप घेणारा महिला आयोग उर्फीबाबत गप्प?

अयोध्येत उभे राहणार ‘महाराष्ट्र भवन’

काँग्रेसला भगव्या रंगाचा इतका तिरस्कार का?

तक्रारदार हे गेल्या पाच वर्षांपासून स्मशानभूमीत काम करत असून एक जानेवारीला तिघे जण त्यांच्या घरी आले .आमच्यात आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला,असे त्यांनी सांगितले. शिवाय आम्हाला द्राक्षाचा रस पाजून ह्यामुळे तुमचे सगळे रोग दूर होतील.ख्रिश्चन धर्मासाठी प्रार्थना केल्याने तुमची संकटे दूर होतील.

यामुळे फक्त अंधविश्वासाला चालना मिळते दुसरे काहीच होत नाही आता पोलीस याचा शोध कसा घेतात हे महत्वाचे आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा