25 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषहिराबा वयाच्या शंभरीमध्येही जगल्या शिस्तप्रिय जीवन

हिराबा वयाच्या शंभरीमध्येही जगल्या शिस्तप्रिय जीवन

पंतप्रधान मोदी यांनी ब्लॉगमध्ये जागवल्याहेत आईच्या अनेक आठवणी

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. वयाच्या शंभरीमध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला. अत्यंत संघर्षमय जीवन जगलेल्या हिराबा वयाची शतकी खेळी खेळतानाही शिस्तप्रिय जीवन जागल्या. घरच्या कौटुंबिक परिस्थितीने त्यांना प्रत्येक गोष्टींमध्ये शिस्तप्रिय बनवले. त्यामुळेच शंभरी गाठल्यानंतरही त्या तितक्याच सक्रिय होत्या. या वयातही ती स्वतःचे काम सांभाळण्याचा प्रयत्न असे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी यावर्षी जूनमध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक ब्लॉग लिहिला होता. या ब्लॉगमध्ये त्यांनी आपल्या आईच्या अनेक आठवणी लिहिल्या आहेत. त्यावरून हिराबा यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाचा अनुभव येतो.

पंतप्रधान मोदी यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, माझ्या आईने कधी शाळेचा दरवाजाही बघितला नाही. बघितली ती गरिबी आणि घरातील अनेक कमतरता. हिराबा लहान असतांनाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे त्यांना आईचे प्रेम मिळाले नाही असे मोदी यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

हिराबा यांचा जन्म १८ जून १९२३ रोजी गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील विसनगर येथे झाला. हे गाव वडनगरच्या जवळ आहे. वडनगर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ गाव आहे. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतरच काही लोकांना त्यांच्याबद्दल माहिती झाली.

मोदी ब्लॉगमध्ये म्हणतात की, त्यांचे वडील रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे आणि मोदी स्वतः लहानपणी त्यांना मदत करायचे. लग्नानंतर नरेंद्र मोदींचे आई-वडील वडनगरला स्थायिक झाले. दामोदर दास आणि हिराबेन यांना एकूण सहा मुले होती, ज्यात पाच मुले (सोमा मोदी, अमृत मोदी, नरेंद्र मोदी, प्रल्हाद मोदी, पंकज मोदी) आणि एक मुलगी वासंती मोदी यांचा समावेश होता. नरेंद्र मोदी हे तिसरे पुत्र आहेत.

मुलांनी लिहून वाचन करून शिकावे ही इच्छा

त्यांचं वडनगरमधलं घर अगदी छोटं होतं आणि हिराबा यांना त्याच घरात सहा मुलांचे पालनपोषण करायचे होते. हिराबाच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य त्यांनी मांडलेला संघर्ष होता. सुरुवातीच्या आयुष्यापासून आजपर्यंत हिराबाचा दिनक्रम अतिशय शिस्तबद्ध होता. मोदी आजही आईकडून शिकण्याचा प्रयत्न करतात. हिराबाचा जन्म पालनपूरमध्ये झाला, लग्नानंतर त्या वडनगरला शिफ्ट झाल्या. घरची आर्थिक व कौटुंबिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही. पण तिने आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी इतरांच्या घरी कामही केले. फी भरण्यासाठी त्यांनी कधीही कोणाकडून पैसे घेतले नाहीत. आपल्या सर्व मुलांनी लिहून वाचन करून शिकावे अशी हिराबा यांची इच्छा होती.

हे ही वाचा:

निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे? स्था

यी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?

ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश

स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?

सर्व कामे स्वतःच करायच्या
त्या नेहमी कामात व्यग्र असायच्या . पहाटे चार वाजता त्यांचा दिनक्रम सुरू असायचा. त्यानंतर त्या आधी घरची कामे करायच्या . मग दुसऱ्यांच्या घरी कामाला जायच्या . मुलांना वाढवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले. आई केवळ घरातील सर्व कामे स्वतःच करायच्या. त्या ती काही घरांमध्ये भांडी धुवायची आणि घरखर्च भागवण्यासाठी चरखा कातण्यासाठी वेळ काढायच्या असे मोदी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

परिपूर्णतेची भावना या वयातही तशीच

हिराबा यांना सर्व प्रकारचे घरगुती उपचार माहित होते. अनेक महिला त्यांच्या समस्या हिराबा यांना येऊन सांगत असत . आपल्या आईच्या जीवनशैलीचा संदर्भ देत मोदींनी लिहिले आहे की, आईने सुरुवातीपासूनच स्वच्छतेला महत्त्व देत आहे. तिच्या प्रत्येक गोष्टीत परिपूर्णतेची भावना या वयातही तशीच आहे. आणि आता गांधीनगरमध्ये माझ्या भावाचे कुटुंब आहे, माझ्या पुतणीचे कुटुंब आहे, ती आजही सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करते. मोदींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही हे देखील पाहिले असेल की, माझी आई कधीही कोणत्याही सरकारी किंवा सार्वजनिक कार्यक्रमात माझ्यासोबत येत नाही. आतापर्यंत असे फक्त दोनदा घडले आहे जेव्हा ती कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात माझ्यासोबत आली असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा