26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषगावापासून लांब आहात. मतदान करायचेय, नो टेन्शन!!!

गावापासून लांब आहात. मतदान करायचेय, नो टेन्शन!!!

मतदानाची टक्केवारीही वाढणार

Google News Follow

Related

शिक्षण आणि कामधंद्यानिमित्त बहुतांश व्यक्ती आपल्या गावा-शहरापासून दूर राहत असतात. निवडणुकीवेळी त्यांना मतदानाला जाता येत नाही. कागदपत्रे, पुरावे आणि लांबच लांब रांगा या कारणास्तव मतदारयादीत नाव टाकण्यासाठी टाळाटाळ केली जाते. साहजिकच या कारणामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहवे लागते. अशा मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असा आपल्या भारत देशाचा उल्लेख होतो. गेल्या ७० वर्षांपासून आपल्या देशात निवडणूक प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. मतदान करण्याचा हक्क १८ वर्षे पूर्ण असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे. ज्या मतदारसंघात आपले नाव असते, त्या मतदार केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावता येऊ शकतो. मात्र नोकरी, व्यवसायानिमित्त अनेक जण बाहेर गावी, आपल्या शहरा-गावापासून दूर असतात. इतर कारणांमुळे नोंद असलेल्या मतदारसंघात जाता येत नाही.

या कारणांमुळे त्यांना मतदान करता येत नाही. परंतु आता या सर्व बाबींतून सुटका होणार आहे. तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असा. मतदान करून तुम्हाला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. कारण राष्ट्रीय राष्ट्रीय निवडणूक आयोग मतदान प्रक्रियेत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे.

हे ही वाचा:

निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे? स्था

यी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?

ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश

स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?

रिमोट मतदान करण्याची सुविधा देण्यासाठी आयोगाने तयारी केली आहे. त्यामुळे कुठूनही मतदान करता येणे शक्य होणार आहे. निवडणूक आयोगाने राज्यांकडून याबाबत मते मागवली आहेत. ३१ जानेवारीपर्यंत लिखित स्वरुपात यावरचे मत राज्यांना द्यायचे आहे. तर १६ जानेवारीला ८ राष्ट्रीय पक्ष आणि ५७ प्रादेशिक पक्षांच्या प्रतिनिधींना याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात येणार आहे. अशा लाखो मतदारासांसाठी निवडणूक आयोगाचा हा निर्णय संजीवनी ठरणार आहे. मतदानाची टक्केवारीही वाढण्यास त्यामुळे मदत होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा