27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणदेवेंद्र फडणवीस यांनी घेतला सुषमा अंधारेंच्या वक्तव्यांचा समाचार

देवेंद्र फडणवीस यांनी घेतला सुषमा अंधारेंच्या वक्तव्यांचा समाचार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सडकून टीका

Google News Follow

Related

सध्या नागपूरात भरपूर थंडी जरी असली तरी हिवाळी अधिवेशनामुळे वातावरण भरपूर तापले आहे. आरोप प्रत्यारोपांमुळे रोज काही नवीन घडत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या ज्यांना सध्या शिवसेनेची तोफ समजतात त्या सुषमा अंधारे यांनी सीतामाईंबद्दल आणि इतरही देवांबद्दल अपशब्द वापरल्याचा मुद्दा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यांचा दाखला देत विरोधी पक्षांवर जोरदार आक्रमण केले.
 

देवेंद्र फडणवीसांचे सडेतोड मुद्दे

राम आणि कृष्ण थोतांड आहे, सात महिने अगोदर सीतामातेला जो सोडून जातो, स्वतः शबरीबरोबर बोरे खातो, कुछ हुआ तो क्या ,हमने तुमको देखा तुमने हमको देखा ,असा देवांबद्दल बोलले जाते देवांचे अपमान होतात असा देवांचा अपमान करणाऱ्या तुमच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणतात, अशी पोलखोल फडणवीस यांनी यावेळी केली.

कृष्ण बायकांना अंघोळ करताना पाहतो, कृष्ण पुन्हा अवतरत नाही, कुठल्यातरी गोपिकेसोबत डेटला गेला असावा असे आमच्या कृष्णदेवाबद्द्ल तुमच्या नेत्या बोलतात तर तुम्ही काही बोलत नाही, त्याच्यावर मूग गिळून बसले आहात , त्या म्हणतात या देशातील लोक इतके मेरिट वाले होते की, त्याकाळात माकडे पूल बांधत होती , त्या देशातच मारुती उडून जातो तो उडूनच सीतामाईला घेऊन येऊ शकतो असे त्या देवांबद्दल बोलतात, तरीही तुमच्याकडून प्रतिक्रिया येत नाहीत, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

याआधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थानाचा वाद चालतो, छत्रपतींबद्दल बोलले तर चूक दाखवतात , संजय राऊत शिवाजी म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करत नाहीत याचीही आठवण फडणवीस यांनी करून दिली. कोणाच्याच जन्मस्थानावरून वाद होऊ नये आणि चुकीचे बोलले जाऊ नये हे गरजेचे आहे. ‘रेनेसान्स स्टेट’ हे पुस्तक वाचून इंटरेस्टिंग आहे असे सुप्रिया सुळे म्हणतात. त्या पुस्तकांत शंभूराजांच्याबद्दल काय लिहिले आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणणारे हेच विरोधी पक्षाचे आहेत, असाही समाचार  देवेंद्र फडणवीसांनी घेतला.

हे ही वाचा:

पंतप्रधानांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही

तैलचित्रातून दिसेल बाळासाहेबांचा वारसदार

खंडणी प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक

बाबासाहेब आणि छत्रपतीवर बोलणाऱ्यांवर, देवांवर टीका करणाऱ्यांवर तुमच्याच पक्षातल्या बाईंवर काय कारवाई करणार याकडे  देवेंद्र फडणवीसांनी  सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा