शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार नितीन देशमुख यांच्यावर नागपुरात सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एकनाथ शिंदे आणि काही आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबत असलेले नितीन देशमुख त्यानंतर तिथून बाहेर पडत पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आले. मात्र आता या घटनेनंतर आमदार नितीन देशमुखांच्या अडचणी वाढल्या आहेत. नागपुरात यासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्रातून नॉट रिचेबल होऊन,आधी सूरत आणि नंतर गुवाहटी गाठणाऱ्या शिंदे गटातील आमदारांची बंडखोरी हे राज्याच्या राजकारणात गाजलेलं महानाट्यच होते. याच नाट्यातील एक पात्र म्हणजे आमदार नितीन देशमुख. मुंबईतून सूरतेला निघालेले मात्र गुजरात सीमेवरूनच परत फिरलेले आणि सध्या ठाकरे गटातील हे आमदार. नितीन देशमुख यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यांच्याविरोधात नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पी.एसआय सखाराम कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नागपूर शहरामध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन-2022 सुरु आहे. वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने कांबळे यांची रविभवन मुख्य प्रवेशद्वार इथे ड्यूटी लागली होती. सकाळी रविभवन येथे येणाऱ्या सर्व वाहनांचे पासेस तपासून तसेच येणाऱ्या व्यक्तींचे तेथेच बाजूला लागलेल्या पेन्डॉलमध्ये पासेस तयार करून झाल्यानंतर ते पासेस चेक करुन त्या व्यक्तींना आत प्रवेश देत होते.
यावेळी पोलीस निरीक्षक शरद कदम, तसेच सीआरपीएफचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी असे कर्तव्य करीत होते. दरम्यान, काल 27 डिसेंबर रोजी रवि भवन मुख्य प्रवेशद्वाराजवळ लोकांची खूप गर्दी झाली होती. तेव्हा एका पांढऱ्या रंगाच्या वाहनातून एक व्यक्ती खाली उतरुन त्याचे सोबत पाच ते सहा व्यक्तींना येऊन कर्तव्यावर हजर असलेल्या पोलीस निरीक्षक कदम तसेच कांबळे यांच्याशी हुज्जत घातली. तसेच कर्तव्य बजावताना कामात अडथळे आणले,असा आरोप कांबळे यांनी केला आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधानांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही
तैलचित्रातून दिसेल बाळासाहेबांचा वारसदार
खंडणी प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक
शासकीय कर्तव्य करीत असताना मला हाताने धक्का देवून जबरदस्तीने त्यांच्या सोबत तेथे जमा असलेले काही लोकांनी विना पासचे रविभवनच्या आतमध्ये जबरदस्ती प्रवेश केला, त्यांनी म्हटले की, ‘मी बाळापूर विधान सभा क्षेत्राचा आमदार नितीन देशमुख आहे, तुला व तुझ्या पीआय ला उद्या पाहून ‘घेतो’ असे म्हणून शासकीय काम करीत असतांना मला धक्का देवून माझ्या कर्तव्यापासून परावृत्त करून कामात अडथळा निर्माण केला.
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार नितीन देशमुख यांच्यावर नागपुरात सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पीएसआय सखाराम एकनाथ कांबळे (वय 31 वर्ष) यांनी दिलेल्या तक्रारीवरून 353, 186, 448, 294, 506, 34 या कलमानुसार नागपुरातील सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.