24 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरधर्म संस्कृतीलव्ह जिहादची वाढती प्रकरणे, हिंदू मुलींचे कुठे चुकते आहे?

लव्ह जिहादची वाढती प्रकरणे, हिंदू मुलींचे कुठे चुकते आहे?

लव्ह जिहादची गेल्या महिन्याभरात अनेक प्रकरणे

Google News Follow

Related

गेल्या अनेक दिवसांपासून देशात अनेक ठिकाणी हिंदू मुलींच्या हत्येच्या घटना प्रकर्षाने समोर आल्या आहेत. या घटनांमुळे एकंदरीत देशभरात त्याविषयी भीती व्यक्त केली जात आहे. अनेक राज्यात यानिमित्ताने लव्ह जिहाद कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली असून काही राज्ये या कायद्याची निर्मिती करण्याचा विचार करत आहेत. कारण या सगळ्या प्रकरणात बळी गेलेल्या मुली या हिंदू आहेत आणि त्यांच्या छोट्या छोट्या कारणांमुळे हत्या करण्यात आल्या आहेत. त्यांचीही पावले चुकीच्या दिशेने पडली आहेत, याबाबतही आता जनमानसात चर्चा आहे. त्या चुका कोणत्या आहेत, याचा शोध घेतला पाहिजे, असे

नोव्हेंबर महिन्यात आफताब अमीन पूनावाला नावाच्या नराधमाने श्रद्धा वालकर ह्या मुलीचा खून करून तिच्या देहाचे ३५ तुकडे केल्याची बातमी अंगावर काटा आणणारी होती. केवळ लग्न करण्यासाठी श्रद्धाने आफताबला विनंती केली त्यावरून राग येऊन त्याने श्रद्धाला ठार मारल्याचे स्पष्ट झाले. आफताबला या प्रकरणात अटकही झाली आहे. श्रद्धाचेच प्रकरण नव्हे तर रोज अशाचप्रकारच्या नवनव्या बातम्या समोर येत आहेत. त्यात हिंदू मुलींची निर्घृण पद्धतीने हत्या होत असून या विषयाची देशभरात चर्चा होत आहे.

श्रद्धा वालकरचा खून उघडकीला आल्यानंतर उत्तर प्रदेशात निधीची हत्या झाल्याची बातमी समोर आली. निधी गुप्ता नावाच्या लखनऊच्या मुलीला मोहम्मद सुफीयां ह्या नराधमाने त्याची गर्लफ्रेंड बनून धर्म परिवर्तन करायला तयार होत नाही म्हणून चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून दिलं. त्या मुलीचा इमारतीवरून पडून अंत झाला. त्यावेळी तिचे वय अवघे १९ वर्षे होते. झारखंडमध्ये अशीच घटना घडली. तिथल्या सौरा पहाडी या छोट्या गावातील अनुसूचित जमातीतली रबिता ही फक्त २२ वर्षांची मुलगी.दिलदार नावाच्या इसमाच्या प्रेमात पडली पण नंतर कळलं की त्याचं एक लग्न आधीच झालं होतं. दिलदारशी निकाह करून दहा दिवस पण नसताना त्याच्या घरातल्या लोकांनी रबिताची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे  करत उकिरड्यात टाकले. भटक्या कुत्र्यांच्या तोंडात हे तुकडे दिसल्यानंतर हे प्रकरण समोर आले.

मुंबईची घटना अगदी ताजी. रियाझ खान या चाळीस वर्षांच्या जिम ट्रेनरने उर्वशी वैष्णव नावाच्या मुलीला गळा दाबून मारले. या रियाझ खानची तीन लग्ने झालेली. उर्वशी त्याच्याशी लिव्ह इनमध्ये राहात होती. तिनेही रियाझकडे लग्नाची मागणी केली पण त्याला केवळ शरीरसुखातच रस होता. त्यामुळे तिला त्याने बाहेर फिरायला नेण्याच्या बहाण्याने गळा दाबून मारले. तिचा मृतदेह जंगलात फेकून तो पळाला पण तिच्या सँडलवरून पोलिसांना खुनाचा सुगावा लागला.

छत्तीसगडमधील नीलकुसूम अनुसूचित जमातीमधली पण ख्रिस्ती झालेली. ती प्रेमात पडली कुणा शाहबाझच्या. तो छत्तीसगढमध्ये कामावर होता. नीलकुसुम त्याचे फोन उचलत नाही म्हणून हा शाहबाझला राग आला आणि त्याने छत्तीसगढला जाऊन स्क्रू ड्रायव्हरने पन्नास वेळा भोसकून नीलकुसूमला संपवले.

हे ही वाचा:

उझबेकिस्तानमध्ये सिरप प्यायल्याने ‘इतक्या’ मुलांचा मृत्यू

आरएसएसने नाही काँग्रेसनेच नेहमी संविधानाला नुकसान पोहचवले

सीआरपीएफ म्हणते, राहुल गांधी स्वतःच करतात सुरक्षा नियमांचे उल्लंघन

ऑस्ट्रेलियाच्या बाजारपेठेत भारतीय निर्यातदारांचे आता अनोखे स्वागत

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी हा भाग मागे शेतकरी आंदोलनामुळे गाजला होता. तिथे उमा शर्मा ही मोहम्मद वसी याच्या प्रेमात पडली. त्यांचा निकाह झाला आणि ती उमा शर्माची अक्सा फातिमा झाली. उमाने घरच्यांशी संबंध तोडले. दोन मुले झाल्यानंतर मोहम्मद वसीला प्रेमाचा तिटकारा येऊ लागला आणि त्याने बायकोला चक्क वीजेचा धक्का देत मारले. तिला त्याच घरात दफन केले. याच खोलीत तो रोज झोपतही असे. शेवटी तो खून उघडकीला आला.

य़ासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या शेफाली वैद्य यांनी एका पोस्टच्या माध्यमातून या समस्येला वाचा फोडली आहे. या सगळ्या घटना खऱ्या आहेत आणि अवघ्या काही दिवसांत घडलेल्या आहेत. पण दुर्दैवाने या घटनांना मीडियाने काही अपवाद वगळता अजिबात कव्हर केलेले नाही. शेफाली वैद्य म्हणतात की, नैना, अंकिता, निकिता, खुशी, श्रद्धा, रबिता, उमा, उर्वशी… कितीतरी नावे. मरणाऱ्या हिंदू बायकांची. मारणारे कोण तर आफताब, दिलदार, वसीम, शाहबाझ, सुफीयां किंवा असलेच कोणीतरी. अशा ‘इंटर-फेथ’ खुनाच्या घटनांमध्ये सहसा मरणारी बाई हिंदूच का असते आणि मारणारा पुरुष मुसलमानच का हा प्रश्न कुठल्याही सुजाण माणसाला पडेल पण बोलायचं नाही कुणी ह्या विषयावर. कारण बोललात तुम्ही तर सर्वधर्मसमभावाचे स्वघोषित ठेकेदार तुम्हालाच विचारणार, ‘तुम्ही द्वेष का पसरवताय?’ हिंदू बायकांचा खून करणे हा द्वेष नाही, पण त्या बाबत बोलणे म्हणजे द्वेष!

या घटनांमध्ये हिंदू मुलींची हत्या त्यांच्या मुस्लिम नवऱ्यांकडून किंवा प्रियकरांकडून झाल्याचे दिसते. मुस्लिम युवतींची हत्या हिंदू युवकांकडून किंवा त्यांच्या प्रियकरांकडून झाल्याच्या किती घटना देशभरात घडल्या याविषयीही चर्चा होत आहे. मग एवढे घडत असताना या मुलींचे पालक लक्ष देत नाहीत का, त्यांना याचे गांभीर्य वाटत नाही का, मुलगी जीवानिशी गेल्यानंतर पालक त्याबद्दल राग व्यक्त करताना दिसत आहेत, त्याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात जर कायदा केला जात असेल तर तो होणे ही काळाची गरज आहे, असेही मत प्रकर्षाने व्यक्त होत आहे.

हिंदू मुली या अशा प्रेमप्रकरणात अडकतात पण नंतर जेव्हा त्यांना त्याची झळ पोहोचते तेव्हा मात्र त्यांना कुणाचाही पाठिंबा किंवा आधार मिळत नाही. कारण त्यांनी या प्रेमाच्या जाळ्यात अडकत घरदार सोडलेले असते. तेव्हा या प्रेमाच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी सारासार विचार या मुलींनीही केला पाहिजे असा विचार समाजात केला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा