25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषएनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंहविरुद्ध माहिती देण्यास नकार

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंहविरुद्ध माहिती देण्यास नकार

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागविली होती माहिती

Google News Follow

Related

आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे प्रसिद्धी झोतात आलेले एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारींची माहिती देण्यास एनसीबीने नकार दिला आहे. एनसीबीने माहितीचा अधिकार कायदा २००५5चे कलम २४ चा हवाला देत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस माहिती नाकारली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एनसीबीकडे अर्ज करत उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या विरोधात प्राप्त झालेल्या विविध तक्रारींबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल तसेच विविध तक्रारींची सद्यस्थितीची मागणी केली होती. एनसीबीने माहितीचा अधिकार कायदा २००५ चे कलम २४ अंतर्गत माहिती नाकारली आहे. अनिल गलगली याविरोधात प्रथम अपील दाखल केले आहे.

हे ही वाचा:

भारतात आलेले ३९ परदेशी प्रवासी पॉझिटिव्ह

जम्मूमध्ये चकमकीत तीन दशतवाद्यांचा खात्मा

हत्या की आत्महत्या : तुनिषाच्या मृत्यूचे पोलिसांसमोरील वाढते आव्हान

उद्धव ठाकरेंचे अनाहुत सल्ले कुणाला?

अनिल गलगली यांचे म्हणणे आहे की भ्रष्टाचार आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या आरोपाशी संबंधित माहिती आरटीआय कायदा, २००५ अंतर्गत समाविष्ट आहे आणि कोणत्याही एजन्सीला यातून सूट नाही आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की, जर मागितलेली माहिती भ्रष्टाचार आणि मानवी हक्क उल्लंघनाच्या आरोपाशी संबंधित असेल तर ती वगळण्याच्या कलमातून सूट दिली जाईल, याचा उल्लेख करत गलगली यांनी अशी माहिती सार्वजनिक करून वेबसाइटवर अपलोड करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जेणेकरून ही माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होईल.

आर्यन खानला अटक करण्यात आली त्यानंतर या प्रकरणात तत्लाकिन एनसीबीचे झोनल प्रमुख समीर वानखेडे चर्चेत आले होते. याच संदर्भात ज्ञानेश्वर सिंह हे मुंबईत आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा