तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर बुधवारी छापे टाकण्यात आल्यावर समाज माध्यमे आणि प्रसार माध्यमांमध्ये अनेक चर्चा सुरु झाल्या. या विषयावर आता अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनीही पत्रकार परिषदेतून भाष्य केले आहे. २०१३ मध्ये देखील याच व्यक्तींवर छापे टाकण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
अनुराग कश्यप, तापसी पन्नू यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर तीन मार्च रोजी आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले. आयकर विभागाच्या या कारवाईत नेमके काय हाती आले याचे नेमके तपशील अजून समोर आलेले नाहीत. बुधवारी आयकर विभागातर्फे मुंबई, पुणे येथील एकूण बावीस ठिकाणांवर छापे मारल्याची माहिती आहे. ‘फँटम फिल्म्स’ या चित्रपट निर्मिती कंपनीशी संलग्न असलेल्या कलाकारांच्या घरी आणि कार्यालयांवर छापे मारत आयकर विभागातर्फे तपास करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्यावरील छापे हे राजकीय कारणांमुळे केल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात होता. याच विषयीच्या प्रश्नांचे उत्तर देताना निर्मला सीतारमन यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत असे सांगितले की, “कृपया तुम्ही तपासून पाहा, याच व्यक्तींवर २०१३ मधेही छापे टाकण्यात आले होते.” २०१३ मध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार होते, हे निर्मला सीतारमन यांना सांगायचे होते.