23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियानीरज चोप्राचे हे विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?

नीरज चोप्राचे हे विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?

भारताच्या या स्टार खेळाडूला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

Google News Follow

Related

एक शेर हमेशा हमला करने से पहले एक कदम पीछे हट जाता है, मुझे लगता है कि एक एथलीट के जीवन में एक झटका ऐसा ही होता है। हे घोषवाक्य आहे ते म्हणजे भारतचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याचे.

२०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिक अंतिम फेरीत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि सर्वोत्तम भालाफेक करत सुर्वपदक जिंकले. पुढे रातोरात नीरज चोप्राने जगभरात भारताचे नाव गाजवले. भारताच्या या स्टार खेळाडूला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

नीरज चोप्राचा जन्म आज म्हणजेच २४ डिसेंबर १९९७ रोजी हरियाणामध्ये झाला. नीरज हा त्याच्या दोन बहिणींसह त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. नीरजचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी आहे. २०२१ मध्ये त्याने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि भालाफेक स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. त्याच्या यशस्वी ऑलिम्पिक मोहिमेनंतर, नीरज जागतिक ऍथलेटिक्सच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या क्रीडा कारकीर्दीसोबतच, नीरज भारतीय सैन्यात कनिष्ठ आयोग अधिकारी (JCO) म्हणून काम करतो.

पहिल्यांदा २०१३ मध्ये, नीरजने युक्रेनमध्ये जागतिक युवा चॅम्पियनशिप म्हणून आयोजित केलेल्या त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत भाग घेतला. जिथे त्याचा विजय झाला नाही, मात्र अनेक गोष्टी त्याला शिकण्यास मिळाल्या.

नीरज चोप्राचे विक्रम :

  • २०१४ मध्ये युवा ऑलिम्पिक पात्रता जिथे त्याने ७०-मीटर भालाफेकीत करून रौप्य पदक जिंकले होते.
  • त्यानंतर २०१४ ते २०२१ दरम्यान नीरजने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पदके जिंकली.
  • २०१७ आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
  • २०१८ कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावत कॉमनवेल्थ गेम्समध्ये जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.
  • २०१८ आशियाईमध्येसुद्धा नीरजने सुवर्णपदक जिंकले.
  • U20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने ८६.४८ फेक करून रेकॉर्ड ब्रेक केले.
  • नीरजने २०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर भालाफेक करून केवळ सुवर्णपदकच जिंकले नाही तर ऍथलेटिक्समधील भारतासाठी पहिले पदकही पटकवले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये, अभिनव बिंद्रानंतर नीरज हा दुसरा भारतीय वैयक्तिक सुवर्णपदक विजेता ठरला.
  • यावर्षी डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा सर्वोत्तम भालाफेक करत रौप्यपदकही जिंकले.
  • तसेच सर्वात जास्त लिखाण केले गेले या खेळाडूचाही मान नीरज चोप्रालाच मिळाला आहे. दरवर्षी जागतिक ॲथलेटिक्स अशा खेळाडूंची यादी प्रसिद्ध करते ज्यां खेळाडूबद्दल सर्वाधिक लिहिलेले असते. दरवर्षी या यादीत उसेन बोल्ट अव्वल स्थानावर असतो. प्रथमच ॲथलीट्सबद्दल सर्वाधिक लिहिल्या गेलेल्या यादीत अव्वल भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला मिळाले आहे.

हे ही वाचा : 

माजी सैनिकांचे टेन्शन दूर, आता मिळणार पेन्शन

पाकिस्तान विकणे आहे !

५४ वर्षांपूर्वी याच दिवशी मानव प्रथमच चंद्राच्या कक्षेत

मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट

पुरस्कार आणि सन्मान

क्रीडा क्षेत्रातील त्याच्या अतुलनीय योगदानासाठी नीरज चोप्रा यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

  • अर्जुन पुरस्कार
  • पद्मश्री पुरस्कार
  • परम विशिष्ट सेवा पदक
  • भारतीय सैन्याने विशिष्ट सेवा पदकानेही नीरज चोप्राला सन्मानित करण्यात आले आहे.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा