24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनिया५४ वर्षांपूर्वी याच दिवशी मानव प्रथमच चंद्राच्या कक्षेत

५४ वर्षांपूर्वी याच दिवशी मानव प्रथमच चंद्राच्या कक्षेत

२४ डिसेंबरला इतिहसात मोठे महत्व आहे.

Google News Follow

Related

२४ डिसेंबर ही तारीख विविध कारणांनी देशासोबत जगाच्या इतिहासात नोंदवली गेली आहे. २४ डिसेंबर रोजी पहिल्यांदा चंद्राच्या कक्षेत पोचणारी पहिली मानव मोहीम होती. १९६८ मध्ये २४ डिसेंबर रोजी अपोलो-8 चंद्राच्या कक्षेत पोहोचले.

अंतराळवीर फ्रँक बोरमन, जिम लॉवेल आणि विल्यम अँडर्स चंद्राच्या कक्षेतून थेट प्रक्षेपण केले होते. त्याने आपल्या अंतराळ यानामधून चंद्र आणि पृथ्वीची छायाचित्रे पाठवली होती. अंतराळवीर विल्यम अँडर्स यांनी काढलेल्या ‘अर्थराईज’ फोटोमुळे हे मिशन जगभर प्रसिद्ध झाले. हे मिशन २७ डिसेंबर १९६८ रोजी पूर्ण झाले. यानंतर, अपोलो मालिकेतील एक मोहिमेतील अपोलो-11 मध्ये मानव प्रथमच चंद्रावर उतरला. या मोहिमेअंतर्गत २० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग आणि बझ एड्रियन यांनी चंद्रावर पाऊल ठेवले. या मोहिमेत मायकेल कॉलिन्सही त्यांच्यासोबत होता.

तसेच २४ डिसेंबर २००२ रोजी दिल्लीत पहिल्यांदा मेट्रो धावली. तत्कालीन पंतप्रधान अटल विहारी वाजपेयी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले होते. दिल्ली मेट्रो आता दिल्लीतीलच नव्हे तर गुरुग्राम, फरीदाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथील लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. ३ मे १९९५ रोजी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या नोंदणीनंतर अवघ्या पाच वर्षांनी मेट्रो सेवा सुरू करण्याचे श्रेय ई. श्रीधरन यांना जाते. ई श्रीधरन यांना २००५ मध्ये फ्रेंच सरकारने देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ने सन्मानित केले होते. त्यांना २००१ मध्ये पद्मश्री आणि २००८ मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते.

हे ही वाचा : 

भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीचा अपघात

मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदाराने केली सावरकरांच्या स्मारकासाठी मागणी

क्रांतिकारक पाऊल; सौदी अरेबियात परिक्षा केंद्रात हिजाब बंदी

तसेच, २४ डिसेंबर रोजी मारुथूर गोपालन रामचंद्रन म्हणजेच एमजी रामचंद्रन यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. त्यांचे चाहते त्यांना प्रेमाने एमजीआर म्हणतात. एमजीआर यांनी तीन दशके तमिळ चित्रपटसृष्टीवर राज्य केले. शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपट कारकिर्दीत तसेच राजकीय कारकिर्दीत. ३० जुलै १९७७ रोजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. २४ डिसेंबर १९८७ रोजी मृत्यू होईपर्यंत ते या पदावर राहिले. एमजीआर यांना १९८८ मध्ये मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा