30 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरविशेषराष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदाराने केली सावरकरांच्या स्मारकासाठी मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदाराने केली सावरकरांच्या स्मारकासाठी मागणी

सावरकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी १०० कोटी

Google News Follow

Related

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव भगूर येथे त्यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी राज्य शासनाने पुरवणी मागण्यांमधून शंभर कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी आग्रही मागणी देवळाली भगूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे. पुरवणी मागण्यांवर विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान सहभाग घेताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी भगूर मधील सावरकर स्मारकाचा उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सावरकरांवर सातत्याने टीका होते तर सोबत असलेल्या काँग्रेसकडूनही सावरकरांची नेहमीच बदनामी होते. त्यामुळे अहिरे यांच्या या मागणीला वेगळे महत्त्व आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेले भगूर गाव आपल्या मतदारसंघात येते याचा अभिमान वाटत असल्याचे आमदार सरोज अहिरे यांनी सांगितले. तसेच सावरकरांचा जाज्वल्य इतिहास आंतरराष्ट्रीय पातळीवर जनतेसमोर येणे महत्वाचे आहे. त्यासाठी सावरकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक भगूर गावात उभे राहिले पाहिजे यासाठी अधिवेशनात १०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्याचबरोबर भगूर गावातून वाहणाऱ्या दारणा नदीतून जे दूषित पाणी वाहते त्यामुळे शेती आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात त्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी देखील एक प्रकल्प मंजूर करावा अशी मागणी त्यांनी केली. हे ही वाचा : आम्ही करू ते कौतुक, तुम्ही कराल तो अपमान आज ४०५ खेळाडूंवर होणार बोली, ‘हे’ खेळाडू होऊ शकतात मालामाल शिकलात तर याद राखा! अफगाणिस्तानात विद्यापीठे, लायब्ररीतून हाकलले महिलांना पश्चिम रेल्वे करणार ६ गाड्यांचा विस्तार काही दिवसांपूर्वी सरोज अहिरे आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन अधिवेशनाला हजर राहण्यासाठी नागपूरला पोहोचल्या. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आपल्या लहानग्या बाळाचे संगोपन करताना आमदार सरोज अहिरे हे राजकीय आणि सामाजिक कर्तव्याला विसरले नाहीत, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. नागपूर विधान भवनात आमदार सरोज आहीरे यांच्यासाठी खास हिरकणी कक्ष सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन देखील सरोज अहिरे यांच्या हस्ते करण्याचे औचित्य मुख्यमंत्र्यांनी दाखविले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा