30 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरराजकारणमुक्ता टिळक यांचे कर्त्यव्य आणि ध्येयनिष्ठा हा सर्वांसाठीच आदर्श

मुक्ता टिळक यांचे कर्त्यव्य आणि ध्येयनिष्ठा हा सर्वांसाठीच आदर्श

 शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीच्या ध्येयनिष्ठ कार्यकर्त्या, विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ॐ शांती. या कठीण प्रसंगात आम्ही सारेच त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबियांना लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मुक्ताताई पुण्याच्या माजी महापौर सुद्धा होत्या. त्यांनी अनेक विकास कामात मोठे योगदान दिले. पक्षाबद्दल त्यांची प्रतिबद्धता ही अवर्णनीय अशीच होती. अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अलिकडे झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी न येण्याची विनंती करून सुद्धा आणि त्यांची प्रकृती साथ देत नसतानाही त्या रुग्णालयातून आल्या होत्या. सुमारे ३० वर्ष त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. पुणे भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा, नगरसेविका, महापौर आणि आमदार अशा विविध भूमिकांमधून त्यांनी पुण्याचा विकासात मोठे योगदान दिले. संघटनेसाठी त्यांनी बजावलेले कर्त्यव्य आणि ध्येयनिष्ठा हा सर्वांसाठीच आदर्श असेल. असे फडणवीस यावेळी म्हणाले.

भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्यावर शुक्रवारी पुण्याच्या नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे बुधवारी कर्करोगाने निधन झाले. गेल्या दीड महिन्यांपासून पुण्यातील गॅलेक्सी केअर खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार प्रवीण दरेकर त्याच बरोबर भाजपचे अनेक नेते अंत्य संस्काराला उपस्थित होते.

आदर्श लोकप्रतिनिधी गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कसबा मतदारसंघातील आमदार श्रीमती मुक्ता टिळक यांच्या निधनाने एक उत्तम समाजसेविका आणि आदर्श लोकप्रतिनिधी आपण गमावल्या आहेत. अशी श्रद्धांजली आदर्श लोकप्रतिनिधी गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कसबा मतदारसंघातील आमदार श्रीमती मुक्ता टिळक यांच्या निधनाने एक उत्तम समाजसेविका आणि आदर्श लोकप्रतिनिधी आपण गमावल्या आहेत.अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिवंगत टिळक यांनाअर्पण केली.

हे ही वाचा :

शिकलात तर याद राखा! अफगाणिस्तानात विद्यापीठे, लायब्ररीतून हाकलले महिलांना

आजच्या शेतकरी दिनाचं महत्व काय?

आम्ही करू ते कौतुक, तुम्ही कराल तो अपमान

आज ४०५ खेळाडूंवर होणार बोली, ‘हे’ खेळाडू होऊ शकतात मालामाल

एका पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे नुकसान
विधानसभा सदस्य मुक्ता टिळक यांच्या निधनाने केवळ एका पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी शोक भावना व्यक्त केल्या. ॲड.नार्वेकर म्हणाले, लोकप्रतिनिधींनी पक्षनिष्ठा आणि कर्तव्य कसे बजावावे याचे त्या मूर्तिमंत उदाहरण होत्या. आजारी असतानासुद्धा त्या सभागृहाच्या कामकाजात सहभागी होत असत. अशा निष्ठावान, कर्तृत्ववान लोकप्रतिनिधींच्या निधनाने केवळ पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे नुकसान झाले आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा