आवाहन आखाड्याचे आचार्य शेखर यांच्या आंदोलन सुरू करण्याच्या दबावामुळे पश्चिम रेल्वेला मध्य प्रदेशातील उज्जैनीतील चिंतामण गणपती रेल्वे स्थानकाचे उर्दू नाव हटवावे लागले आहे.
हे ही वाचा:
मालकाच्या संशयास्पद मृत्युनंतर ‘अँटिलीया ‘ बाहेरच्या स्कॉर्पिओचे गूढ वाढले.
या हिंदू महंतांनी भारतीय रेल्वेवरील हिंदू देवदेवतांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सर्व स्थानकांचे उर्दू नाव हटविण्याची मागणी केली आहे. उज्जैन- इंदूरला फतेहाबादला जोडणाऱ्या मार्गावरील उज्जैनपासून सहा किमी अंतरावर पश्चिम रेल्वेने चिंतामण गणेश रेल्वे स्थानक बांधले होते. या परिसरातील प्रसिद्ध चिंतामण गणेश मंदिराच्या नावावरून या स्थानकाचे नाव देण्यात आले होते.
रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी जितेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार हा फलक उर्दूतून चुकून लिहीला गेला होता. या फलकावर आम्ही पुन्हा पिवळा रंग देऊन ही चूक दुरूस्त केली आहे.
मध्य प्रदेश भाजपा प्रदेश प्रवक्ते राजनेश अग्रवाल हे म्हणाले की, फलक लोकांना माहिती देण्यासाठी असतात की खुश करण्यासाठी? रेल्वे अधिकारी उर्दूतून फलक लिहीण्याबाबत इतके आग्रही का आहेत? की ते समाजातील विशिष्ट घटकासाठी हे करत आहेत? रेल्वेने संतांचा आदर केलाच पाहिजे.
याच प्रमाणे २०२० मध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी उत्तराखंडमधील सर्व रेल्वे फलक उर्दू ऐवजी संस्कृतमध्ये लिहीण्याचा निर्णय घेतला. ज्या फलकांवर हिंदी, इंग्लीश आणि उर्दू मध्ये फलक आहेत ते बदलून हिंदी, इंग्लीश आणि संस्कृत करण्यात आले होते.
हा बदल रेल्वेच्या नियमानुसार करण्यात आला होता. फलकांबाबतच्या रेल्वेच्या नियमानुसार रेल्वेचे सर्व फलक हे हिंदी, इंग्लीश आणि नंतर राज्याच्या दुसऱ्या अधिकृत भाषेत लिहीले जावेत. २०१० मध्ये उत्तराखंड हे भारतातील संस्कृतला दुसऱ्या भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य बनले होते.