25 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरराजकारण'आगामी निवडणूका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार'

‘आगामी निवडणूका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

Google News Follow

Related

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकीबाबत एक मोठा खुलासा केला आहे. आगामी निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. फडणवीसांच्या या घोषणेनंतर आता देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी याचं स्पष्टीकरण दिलं आहे. मी महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

दैनिक लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी याबाबत भाष्य केले आहे. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. मी मुख्यमंत्रीपद भूषवलेलं असल्याने पुन्हा मंत्रिमंडळात काम करणं मला पटत नव्हतं. त्यामुळे मी मंत्रिमंडळाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला. मला महाराष्ट्रात भाजपा पक्षातून काम करायचे होते. माझ्या भूमिकेवर पक्षानेही सहमती व्यक्त केली होती. मात्र, वरिष्ठांनी नंतर निर्णय बदलला आणि मला मंत्रिमंडळात सहभागी व्हावे लागले. म्हणूनचं मला दिल्लीला कुणी पाठवू शकत नाही, मी महाराष्ट्रातच राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.

शिवसेनेच्या अतिमहत्वाकांक्षेमुळे विधानसभा निवडणुकीवेळी युती तुटली. त्यामुळे अचानक आम्हाला सर्व जागा लढवाव्या लागल्या. पुढे २०१९ साली आम्ही शिवसेनेसोबत युती करून १५० जागांवर निवडणूक लढवली. त्यातल्या १०५ जागांवर भाजपाला विजय मिळाला. स्वबळावर लढलो असतो तर जादुई आकडा गाठता आला असता, असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा :

राज्यात आज ग्रामपंचायतींच्या निवडणुका

बाळासाहेबांचे विचार मोडून तोडून टाकणे ही लफंगेगिरीचं

घाटकोपरला रेस्टोरंटच्या तळमजल्यावर आग, १ ठार

चीनची चालना रोखण्यासाठी आयएनएस मुरमुगाव हिंद महासागरात झेपावणार

शिंदे गटाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत काम करताना मजा येतं आहे. सल्लामसलत करणं सोपं जातं आहे. त्यामुळे निर्णय लवकर घेण्यास मदत होतं आहे. आमचं सरकार आता स्थिरस्थावर झालं आहे. वित्त खातं माझ्याकडे असल्यानं मी आर्थिक शिस्त पाळण्यावर भर देत आहे. आमदारांकडून विकासासाठी निधीची मागणी होत असली तरी तिजोरीचा अंदाज घेऊनच कामं मंजुर करावे लागतात, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा