25 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरराजकारणराज्यात आज ग्रामपंचायतींच्या निवडणुका

राज्यात आज ग्रामपंचायतींच्या निवडणुका

थेट जनतेतून सरपाचांची निवड

Google News Follow

Related

राज्यातील ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी आज,१८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या माध्यमातून थेट जनतेतून सरपांचांची निवड केली जाणार आहे.

राज्यातील सात हजार ७७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी नक्षलग्रस्त जिल्हे वगळून अन्य सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन या वेळेत मतदान होणार आहे.

मंगळवार,२० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतर लगेचचं निकाल जाहीर केला जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील आक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहीर केला होता. या निवडणुकीमध्ये अनेक जिल्ह्यातील गावामध्ये ग्रामपंचायतींचे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निकालाची केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. पुणे जिल्ह्यातील २२१ पैकी २७ ग्रामपंचायतींचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

हे ही वाचा :

बाळासाहेबांचे विचार मोडून तोडून टाकणे ही लफंगेगिरीचं

घाटकोपरला रेस्टोरंटच्या तळमजल्यावर आग, १ ठार

चीनची चालना रोखण्यासाठी आयएनएस मुरमुगाव हिंद महासागरात झेपावणार

चंद्रावर पडणार एका महिलेचे पाऊल

दरम्यान, निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये नगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ, नांदेड, नाशिक या ३४ जिल्ह्यांमधील ३४० तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा