25 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषघाटकोपरला रेस्टोरंटच्या तळमजल्यावर आग, १ ठार

घाटकोपरला रेस्टोरंटच्या तळमजल्यावर आग, १ ठार

तीनजण जखमी

Google News Follow

Related

मुंबईतील घाटकोपर परिसरात भीषण आग लागली. ही आग पारेख हॉस्पिटलजवळील जुनोज पिझ्झा रेस्टॉरंटला लागली आहे. या आगीत एकाचा मृत्यू झाला तर तीनजण जखमी झाले आहेत. मुंबई अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पारेख हॉस्पिटलजवळ विश्वास इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या जुनोज पिझ्झा हॉटेलच्या इलेक्ट्रिक मीटर रूममध्ये ही आग लागली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत तीन जण जखमी झाले असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी कुर्शी देधिया (४६) याला मृत घोषित करण्यात आले. अन्य दोन जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यातील तानिया कांबळे (१८) ही आगीत १८ ते २० टक्के भाजली आहे. कुलसुम शेख या २० वर्षाच्या नावाच्या आणखी एका महिलेचा आगीत श्वास गुदमरला आणि सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत,” असे राजावाडी हॉस्पीटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

आग लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर  २२ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. या धुरामुळे इमारत आणि पारेख रुग्णालयातील रुग्ण आणि नागरिक अडकून पडले होते. स्थानिक पोलीस आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने या सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात यश आले.

हे ही वाचा:

महापुरुषांसाठी की शिंदे-फडणवीस सरकारला विरोध करण्यासाठी महामोर्चा?

उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल

‘अरुणाचलच्या तवांगमध्ये धर्मांतरणाविरोधात लढणारा सैनिक म्हणजे तेची गुबीन’

ठाकरेंचा घँडीवाद

घाटकोपर येथील पारेख हॉस्पिटलच्या कॉम्प्लेक्समध्ये तळमजल्यावर आग लागल्याची घटना आज दुपारी घडली आहे.  जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आगीची घटना घडताच हॉस्पिटलमधील २५ रुग्णांना राजावाडी रुग्णालयात सुरक्षितपणे हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दलाने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्नीशमन दलाला यश आले आहे.  या आग प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा