25 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेष'अरुणाचलच्या तवांगमध्ये धर्मांतरणाविरोधात लढणारा सैनिक म्हणजे तेची गुबीन'

‘अरुणाचलच्या तवांगमध्ये धर्मांतरणाविरोधात लढणारा सैनिक म्हणजे तेची गुबीन’

माय होम इंडियाच्या वतीने वन इंडिया पुरस्कार देऊन केला गौरव

Google News Follow

Related

चीनने अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये केलेल्या आगळिकीमुळे सध्या या भागाची चर्चा असली तरी याच भागात धर्मांतरणाविरुद्ध अथक संघर्ष करून, लढा उभारून भारतीय संस्कृती, वनवासींच्या श्रद्धांचे जतन, संवर्धन करण्याचे कौतुकास्पद काम केले जात आहे. तेची गुबीन यांनी या कामासाठी स्वतःला झोकून दिले आणि अरुणाचलची चंद्र, सूर्याला वंदन करणारी संस्कृती वाढविली, जपली. त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या या कार्याची दखल माय होम इंडिया संस्थेच्या वतीने मुंबईत घेण्यात आली.

माय होम इंडियाच्या वतीने वन इंडिया या पुरस्कारांचे वितरण प्रतिवर्षी करण्यात येते. पूर्वांचलात कार्यरत असलेल्या आणि तेथील संस्कृती, परंपरा, श्रद्धा यांचे जतन करणाऱ्या व्यक्तींचा गौरव या पुरस्कारांच्या माध्यमातून होतो. हे या पुरस्काराचे १२वे वर्ष आहे. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सभागृहात हा सोहळा पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे सीईओ आशीष चौहान, प्रख्यात गायिका आणि कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी अनुराधा पौडवाल, माय होम इंडियाचे अध्यक्ष हरीश शेट्टी, लेखक आणि विचारवंत रमेश पतंगे उपस्थित होते. प्रास्ताविक माय होम इंडियाचे संस्थापक आणि भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केले. मानपद्य, ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

या सत्काराला उत्तर देताना तेची गुबीन म्हणाले की, मी माझा फायद्यासाठी काम करतो. लोकांची सेवा करून मला आनंद मिळतो म्हणून मी सेवा करतो. शिक्षकही राहिलेलो आहे. टीचर्सला मेहनत घ्यावी लागते विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी त्यातून आपले ज्ञानही वाढते. योगा दुसऱ्यांना शिकविल्यामुळे मलाही फायदा होतो दुसऱ्यांनाही होतो. मी कधीही स्वप्नातही पाहिले नाही असा सन्मान मिळेल. हा मोठा सन्मान आहे माय होम इंडियाने दिलेला. २००५मधअये माय होम इंडियाची स्थापना झाली. महाराष्ट्राचे लोक खूप चांगले आहेत. आमच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना शिकवून पुन्हा पाठवतात. पूर्वांचलातील आठ राज्यांना दत्तक घेणे हे मोठे काम आहे.

हे ही वाचा:

ठाकरेंचा घँडीवाद

नीरज चोप्राचा आणखी एक विक्रम

सीमावादामुळे चिनी वस्तूंकडे भारतीयांची पाठ

चक्क एलोन मस्क तोट्यात, ते ही इतके डॉलर?

 

१९७४मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये वाढत असलेल्या चर्चविरोधात पावले उचलली. बायबलला जाळले, चर्चेस जाळली. चर्चेस अधिक प्रमाणात सुरू झाली. पण मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारल्यानंतर जसे होते, तसेच झाले. उलट त्यामुळे अधिक चर्चेस उभी राहिली. ख्रिश्चनिटी वाढली. १९९८-९९मध्ये आम्ही मोहिम सुरू केली. भारतीय श्रद्धा, निशी भारतीय श्रद्धा संस्था सुरू केली. मी संस्थापक होतो. मतांतरणला रोखले अभियाने चालवले. २००१मध्ये आस्था जागविण्यासाठी श्रद्धा जागरण केंद्र स्थापित केले. त्याआधी, इस्ट अरुणाचलमध्ये १९९०मध्ये श्रद्धा जागरण केंद्र सुरू झाले. विविध जनजातींनी ही मोहीम सुरू केली. तवांगमध्येही चर्चेस बनविण्यासाठी प्रयत्न केले गेले. ख्रिश्चन नाही तिथे चर्चेस कशाला हवीत, अशी विचारणा होत होती. तवांगमध्ये चर्च उभारण्यास आमचा विरोध आहे. १९९९मध्ये इंडिजिनस फेथ अँड कल्चरल संस्थेच्या माध्यमातून २५ जिल्ह्यात कार्य सुरू आहे. मंत्रालयही तयार झाले आहे. अरुणाचल प्रदेशातील मतांतरणाला लगाम घातला आहे. मुंबईकडून आमच्या कामाला मदत मिळते. आता तर अरुणाचलमध्ये ६०० जागरण केंद्रे झाली आहेत. १९९० नंतर ती वाढली. लहान मुले, प्रौढ त्यात सहभागी होतात. घरवापसीही होत आहेत. अरुणाचल विकास परिषदेतून श्रद्धा जागरण केंद्रे तयार झाली आहेत. २२ जिल्ह्यांत आम्ही काम करतो आहोत.

तेची गुबीन यांच्या कार्यावर आधारित छोटी डॉक्युमेंट्रीही तयार करण्यात आली आहे. तीदेखील या कार्यक्रमादरम्यान दाखविण्यात आली.

सुनील देवधर यांनी प्रास्ताविक करताना अरुणाचलमधील संघर्षाची कहाणी सांगितली. ते म्हणाले की, एक घटना यानिमित्ताने आठवते ती म्हणजे २० ऑक्टोबर १९६२मध्ये अरुणाचलमध्ये तिरंगा फेकला आणि ड्रॅगन बसवला गेला. आसामच्या तेजपूरमध्ये चिनी सैनिक दिसले. तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना कळवले पण तेव्हा पंतप्रधान म्हणाले आसामच्या लोकांनी वर्तमानातही त्रास सहन कारावा लागू शकतो, माझ्या संवेदना लोकांच्या समवेत आहेत. यापेक्षा अरुणाचलच्या नागरिकांप्रती अपमानजनक असे काय असू शकते? पंतप्रधानांनी त्यांनी मरायला सोडले. कृष्ण मेनन म्हणाले की आम्ही कुणावर आक्रमण करत नाही मग आमच्यावर का कोण आक्रमण करेल. दिल्लीत हिंदी चिनी भाई भाई म्हणताना चिनी आक्रमण झाले. कम्युनिस्ट म्हणाले की, मुक्ती सेना आली. रेल्वे युनियनने तेव्हा हरताळ केला. एवढे मोठे गद्दार कोण असतील.

पण मोदींनी सूत्रे घेतली चीनने डोकलाममध्ये अशीच घुसखोरी केली तेव्हा भारतीय सैन्याने चोख उत्तर दिले. मी मोदींनी भेटून म्हटले भारत चीनशी मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे हा संदेश गेला. मोदींनी मुलाखत दिली होती तेव्हा ते म्हणाले की, आम्ही कुणासमोरही झुकणार नाही, समोरच्याच्या डोळ्याला डोळा भिडविण्याची हिंमत आम्ही ठेवू. त्यानंतर पुन्हा चीनने ९ डिसेंबरला तवांगमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने काठ्यांनी बडवून चिनी लोकांना पळवून लावले. १९६२चा भारत नाही राहिला आता. हा २०२२चा भारत आहे, मोदींचा भारत आहे, नेहरूंचा भारत नाही. एक इंच भूमीही आम्ही देणार नाही असे अमित शहा देखील म्हणाले. खांडूजी मी सर्वांना आवाहन करतो की, लोकांनो खांडू यांना आश्वस्त करा की, आम्ही तुम्च्यासोबत आहोत.

देवधर म्हणाले की, तवांगच्या या सीमेवर गुबीन यांनी सीमांत दर्शन यात्रेचे आयोजन केले होते. तिथे पायी तीन दिवस चालून एक गाव येते अशी स्थिती आहे. शंभरपेक्षा युवांना एकत्र करून गुबीन त्यांना घेऊन गेले. भारतीय सैनिकांनी त्यांना सुरक्षा दिली. अरुणाचलला भीती आहे ती मतांतराची. विधानसभेत एकेकाळी मतांतरच्या विरोधात बिल पास झाले.अरुणाचल विकास परिषदचे अध्यक्ष तेची गुबीन आहेत. अरुणाचल विकास परिषद धर्मांतरणाला कठोर विरोध गोबीन करतात.

आता स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. या देशाला स्वतंत्र करताना त्यात पूर्वोत्तर भारतातील लोकांचाही सहभाग आहे.  देशासाठी काम करणाऱ्यांचा परिचय होण्यासाठी आम्ही हा पुरस्कार देतो आहोत. पूर्वोत्तरातील या लोकांसाठी म्हणून हा पुरस्कार सुरू केला, असेही देवधर म्हणाले.

देवधर यांनी कियान नागबा यांचीही कथा सांगितली. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यात अनेकांचे योगदान आहे. मेघालयचे क्रांतिकारक कियान नागबाही त्यात आहेत.मेघालयात १८५० पासून नागबा यांनी इंग्रजांना आव्हान दिले. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना फाशी दिली. भर बाजारात फाशी दिले. तेव्हा ते म्हणाले की, माझी जर मान पूर्वेला कलली तर भारत स्वतंत्र होईल. त्यांना आपल्या संघर्षाची परिणती कशात होईल हे माहीत होते. फाशी दिल्यावर त्यांची मान पूर्वेला झुकली आणि  भारत शेवटी स्वतंत्र झाला. १८६२मध्ये त्यांना फाशी दिले. १०० वर्षांत भारत स्वतंत्र झाला. बिरसा मुंडा आपल्याला माहीत नव्हते. बिरसा मुंडा यांना माल्यार्पण करणारा पहिला पंतप्रधान जर कोण असेल तर ते नरेंद्र मोदी. महात्मा ज्योतिबा फुले यांचा भव्य कार्यक्रम केला. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली. रेड लाइट भागातील ईशान्य भारतातील मुलींची सुटका केली. ५०० पेक्षा अधिक मुलांना कुटुंबाशी भेट घालून दिली. पण इशान्य भारतातीलच सपनो से अपनो तर ३०००पेक्षा अधइक मुलांची कुटुंबांशी भेट घालून दीली आहे.

सारस्वत बँकेचे माजी अध्यक्ष व संस्थापक एकनाथ ठाकूर यांचे स्मरणही यावेळी झाले. माय होम इंडियाचे ते अध्यक्षही होते. दृष्टिहीन असलेल्या गांधारी यांचे एक गाणेही यावेळी झाले.. ए मेरे वतन के लोगो हे गाणे म्हणून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

गुबीन यांना जे मानपद्य देण्यात आले, ते काव्य दैनिक जागरणचे ब्युरो चीफ ओमप्रकाश तिवारी यांनी लिहिले आहे. त्याचेही वाचन तिवारी यांनी यावेळी केली. प्रसिद्ध गायक सुदेश भोसलेही कार्यक्रमाला आले होते. त्यांचाही सत्कार यावेळी झाला.

प्रसिद्ध विचारवंत आणि लेखक रमेश पतंगे म्हणाले की, भारताच्या संविधानाच्या अभअयास मी व्यग्र आङे सात पुस्तके लिहिली आहेत. संविधनाच्या माध्यमातून बोलतो. We the people of india यातूनच माय होम इंडियाचा आविष्कार झाला. हा पुरस्कार देतानाही याचेच प्रतिबिंब दिसते. प्रीऍम्बलमध्ये लिबर्टी ऑफ थॉट, एक्स्प्रेशन फेथ अँड वर्शिप नमूद केले आहे. भारतातील नागरिकांना विचार, श्रद्धा यांची हमी देऊ इच्छितो. गुबीन जे काम करत आहेत. हे संविधआनाला धरून काम आहे.

अनुराधा पौडवाल म्हणाल्या की, गुबीन यांच्यासारखे लोक आमच्याकडे आहेत याचा अभिमान वाटतो. मुंबईत हे आम्हाला माहीत नसते. पण कळते तेव्हा अभिमान वाटतो. माय होम इंडियाशी मी जोडले गेले आहे याचा आनंद आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा