30 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरविशेषवन अविघ्न इमारतीच्या ३५ व्या मजल्यावर अग्नितांडव

वन अविघ्न इमारतीच्या ३५ व्या मजल्यावर अग्नितांडव

वर्षभरात दुसऱ्यांना या इमारतीमध्ये आगीची घटना घडली आहे.

Google News Follow

Related

मुंबईमधील लोअर परळ परिसरातील वन अविघ्न पार्क इमारतीच्या ३५ व्या भीषण आग लागली आहे. आज, सकाळी ११ च्या सुमारास ही आग लागली आहे. वर्षभरात या इमारतीला दुसऱ्यांदा आग लागली आहे. आगीचे प्रचंड लोट येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे.

लोअर परळ येथील भारत माता सिनेमा जवळ असलेल्या महादेव पालव मार्ग येथे वन अविघ्न पार्क ही ६१ मजली इमारत आहे. गुरुवार, १५ डिसेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास इमारतीच्या ३५ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अद्यापतरी या आगीत कुणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र या आगीमुळे इमारतीतील इतर घरांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. तसेच या आगीचे कारण समोर आलेले नाही.

हे ही वाचा:

बंद घरात आढळला मिठात पुरलेला मृतदेह

अमित शहांचा सल्ला, ‘सीमाभागावर दावे नकोत’

धक्कादायक! दहा ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन

श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारची समिती

२१ ऑक्टोबर २०२१ मध्येही या इमारतीमध्ये आग लागली होती. त्यावेळी १९व्या मजल्यावरुन पडून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. एका वर्षभराच्या कालावधीनंतर पुन्हा इमारतीला आग लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वर्षभरानंतर पुन्हा एकदा याचं इमारतीला नेमकी आग कशामुळे लागली? या आगीचं नेमकं कारण काय? असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा