29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरदेश दुनियापेरूमधील आंदोलकांनी विमानतळ घेतले ताब्यात ; पोलिस अधिकाऱ्यांना ठेवले 'ओलीस'

पेरूमधील आंदोलकांनी विमानतळ घेतले ताब्यात ; पोलिस अधिकाऱ्यांना ठेवले ‘ओलीस’

या देशांत आंदोलकांनी चक्क 'विमानतळ' घेतला ताब्यात

Google News Follow

Related

मागच्या काही महिन्यात अशीच घटना श्रीलंका येथे घडली होती. याच घटनेची पुनरावृत्ती आणखी एका देशात झाल्याचे दिसून येते. तर ११ डिसेंबर रोजी दक्षिणेकडील पेरुव्हियन शहरातील आंदाहुआलास मधील आंदोलकांनी पोलिसांशी हिंसक संघर्षानंतर विमानतळाचा ताबा घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

तेथील हिंसक वातावरण बघून प्रशासन देखील भयभीत झाले आहे. या चकमकीत चार पोलिस अधिकाऱ्यांसह अंदाजे २० जण जखमी झाल्याचे माहिती मिळाली आहे. तर पेरूच्या गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, माजी राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांच्या समर्थनासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत.

राष्ट्राध्याक्षांवर गंभीर आरोप झाल्यानंतर कॅस्टिलो यांना सत्तेवरून हटवण्यात आले. आंदोलकांनी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ५० जणांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळाली आहे. तसेच अनेकांना ताब्यात घेतल्याचे लोकपाल कार्यालयाने सांगितले.

हे ही वाचा: ‘महापुरुषांचा अपमान करण्याचा विचार स्वप्नातही करू शकत नाही’

भूपेंद्र पटेल यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

अनिल देशमुख्यांच्या जामिनावर टांगती तलवार

नागपूर मेट्रोने कोरले गिनीज बुकात नाव

सार्वजनिक सुव्यवस्था पूर्वनियोजित करण्यासाठी कोणत्याही शक्तीचा वापर अथवा कायद्याचा धाक हा त्या चौकटीत असणे आवश्यक आहे. असे तेथील पोलिसांनी सांगितले. आंदोलकांनी डांबून ठेवलेल्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना आता सोडण्यात आले आहे. तसेच पेरूच्या गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, माजी राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले आहेत. प्रकरणातील गंभीर आरोप झाल्यानंतर कॅस्टिलो यांना सत्तेवरून हटवण्यात आले आहे. संसदेत त्यांच्यावर महाभियोग खटला ही चालविण्यात आला. यानंतर पेरूच्या उपराष्ट्रपती दिना बोलुअर्टे यांना राष्ट्रपती करण्यात आले असून अगोदारचे कॅस्टिलोला अटक करण्यात आले आहे. मात्र माजी राष्ट्रपतीनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा