23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरदेश दुनियाजर्सी बेटावर स्फोट, तीन मजली इमारत कोसळली

जर्सी बेटावर स्फोट, तीन मजली इमारत कोसळली

तीन जण ठार , डझनभर इतर बेपत्ता

Google News Follow

Related

उत्तर फ्रान्सच्या किनारपट्टीवरील जर्सी बेटावर १० डिसेंबरच्या पहाटे फ्लॅट्सच्या ब्लॉकमध्ये झालेल्या स्फोटात तीन लोक ठार झाले आणि सुमारे डझनभर इतर बेपत्ता आहेत. जर्सी पोलीस अधिकारी रॉबिन स्मिथ यांनी याला दुजोरा दिला आहे. दुपारी ४ वाजण्याच्या आधी हा स्फोट झाला आणि आता आग आटोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

स्मिथ म्हणाले की आपत्कालीन सेवा वाचलेल्यांचा शोध घेत आहेत. त्यांनी पुष्टी केली की शुक्रवारी संध्याकाळी रहिवाशांनी गॅसचा वास येत असल्याची माहिती दिल्यानंतर आग लागण्यापूर्वी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. स्फोटाच्या कारणाबाबत त्यांनी काहीही भाष्य केले नाही, चौकशी केली जाईल असे सांगितले.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

‘पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे समृद्धी महामार्ग’

‘मन की बात’ कार्यक्रमाचे पुस्तक छापण्यावरून लुबाडले

एका डेंटिस्टचे साखरपुड्याच्या दिवशी अपहरण

स्मिथने सांगितले की, बेटाच्या राजर्सी बेटावरील तीन मजली इमारतीत १० डिसेंबरच्या पहाटे तीन लोक ठार झाले आणि सुमारे डझनभर लोक बेपत्ता झाले. तीन मजली इमारत पूर्णपणे कोसळली आहे. २० ते ३० लोकांना बाहेर काढण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.येथील लोकसंख्या १,००,००० पेक्षा जास्त आहे.

घटनास्थळी आपत्कालीन सेवा कार्यरत असून अपघाताचे कारण शोधले जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधण्यासाठी अपघातस्थळी अधिक शोध आणि बचाव कार्य सुरू असल्याचे काही माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे. त्याच वेळी, जर्सी सरकारने रहिवाशांना अगदी आवश्यक असल्याशिवाय आपत्कालीन विभागात न जाण्यास सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा