23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरदेश दुनियासंकष्टी चतुर्थीला ११ ताऱ्यांचा उदय झाला

संकष्टी चतुर्थीला ११ ताऱ्यांचा उदय झाला

अकरा तारे महाराष्ट्राचे भविष्य बनवणार आहेत

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूरमध्ये विविध प्रकल्पांचे लोकार्पण केले आहे. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीमधून केली. आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभकार्य करताना आपण पहिल्यांदा गणेश पूजन करतो. आज आपण नागपुरात आहोत तर टेकडीच्या गणपतीला माझं वंदन, असं पंतप्रधान म्हणाले.

११ डिसेंबरचा आजचा दिवस संकष्टी चतुर्थीचा पवित्र दिवस आहे. या ११ डिसेंबरच्या मुहूर्तावर महाराष्ट्राच्या विकासासाठी अकरा ताऱ्यांचा उदय झाला आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदींनी सांगितलेले अकरा तारे

  • पहिला तारा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
  • दुसरा तारा नागपूर एम्स आहे, ज्याचा लाभ विदर्भातील मोठ्या भागातील लोकांना होणार
  • तिसरा तारा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थची स्थापना आहे.
  • चौथा तारा रक्तासंदर्भातील रोगांच्या नियंत्रणासाठी चंद्रपुरात बनलेलं आयसीएमआरचं रिसर्च सेंटर
  • पाचवा तारा पेट्रोकेमिकल क्षेत्रासाठी खूपच महत्वाचा सीपेट चंद्रपूर
  • सहावा तारा नागपुरात नाग नदीचं प्रदुषण कमी करण्यासाठी सुरु झालेला प्रकल्प
  • सातवा तारा नागपूरमध्ये मेट्रो फेज वनचा लोकार्पण आणि दुसऱ्या फेजचं भूमिपूजन
  • आठवा प्रकल्प नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस
  • नववा तारा नागपूर-अजनी रेल्वे स्टेशनचा विकास प्रकल्प
  • दहावा तारा अजनीमध्ये बारा हजार हॉर्सपॉवरच्या इंजिनाच्या देखभाल प्रकल्प
  • तारा नागपूर-इटारसी लाईनवर कोली नरके मार्गाचं लोकार्पण आहे

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

‘पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे समृद्धी महामार्ग’

‘मन की बात’ कार्यक्रमाचे पुस्तक छापण्यावरून लुबाडले

एका डेंटिस्टचे साखरपुड्याच्या दिवशी अपहरण

अकरा ताऱ्यांचे हे नक्षत्र महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा, नवी उर्जा देणार आहेत. आज मी तुमच्यासमोर अकरा तारे सांगितले आहेत तेच तुमचं भविष्य बनवणार आहेत, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा