27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामाएनआयएने पुन्हा जारी केले चार दहशतवाद्यांचे पोस्टर

एनआयएने पुन्हा जारी केले चार दहशतवाद्यांचे पोस्टर

प्रत्येकी १० लाखांचे बक्षीस जाहीर

Google News Follow

Related

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए ) पुलवामामध्ये पुन्हा एकदा चार दहशतवाद्यांचे पोस्टर जारी केले आहेत. एनआयएने या चार दहशतवाद्यांवर प्रत्येकी १० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. या चार दहशतवाद्यांचा मोठ्या प्रमाणावर शोध सुरू आहे. त्यांना शोधण्यासाठी सर्व यंत्रणांनी मिळून मोहीम राबवली आहे. या अंतर्गत लोकांना त्यांच्याबद्दल सावधही केले जात आहे.

१८ नोव्हेंबर २०२१ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात एनआयए या दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. हा खटला हिंसक कारवाया, तरुणांचे कट्टरतावाद आणि दहशतवादात भरतीसाठी रचलेल्या कटाशी संबंधित आहे. ज्या दहशतवाद्यांवर बक्षीस जाहीर करण्यात आले होते, त्यापैकी तीन पाकिस्तानमध्ये आहेत, तर एक बासित अहमद दार काश्मीरमध्ये टीआरएफचे कमांडिंग करत आहे.

या चार दहशतवाद्यांपैकी सलीम रहमानी आणि सैफुल्ला साजिद जट हे पाकिस्तानी आहेत. हे दोघेही सध्या पाकिस्तानात आहेत. सुमारे पाच वर्षे काश्मीरमध्ये सक्रिय राहिल्यानंतर साजिद जट २००७ मध्ये पत्नीसह नेपाळमार्गे पाकिस्तानात पळून गेला होता.सलीम आणि साजिद जट हे गेल्या तीन वर्षांपासून पीओकेमधून लष्कराच्या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये पाठवण्याचे काम करत होते. साजिद जट्टने सज्जाद गुलच्या मदतीने काश्मीरमध्ये टीआरएफ नेटवर्क तयार केले आहे.

हे ही वाचा :

‘लव्ह जिहाद’ कायद्याची पडताळणी सुरु, फडणवीसांची माहिती

‘या’ शहरात आहे सोन्याची नाणी देणारे एटीएम

भिवंडीत सराईत गुंड गणेश कोकाटेवर अज्ञात गुंडाचा गोळीबार

मुलानेच ७० वर्षीय आईची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, पण

बासित अहमद दार आणि सज्जाद गुल हे अन्य दोन दहशतवादी काश्मीरमध्ये आहेत. सज्जाद गुल हा श्रीनगरच्या एचएमटी भागातील रहिवासी असून तो गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानमध्ये आहे. सज्जाद गुल हा प्रतिबंधित दहशतवादी ब्लॉग द काश्मीर फाईट्सचा ऑपरेटर असल्याचेही सांगितले जात आहे. तो लष्करच्या प्रमुख दहशतवाद्यांपैकी एक आहे. गेल्या चार वर्षांत श्रीनगरमध्ये झालेल्या हत्यांमध्ये त्याचे नाव आले आहे. दक्षिण काश्मीरमधील रेडवानी कुलगाम येथील बासित अहमद दार हा काश्मीरमधील टीआरएफचा ऑपरेशनल चीफ कमांडर असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी एप्रिलमध्येही एनआयएने लश्करच्या प्रॉक्सी संघटना टीआरएफच्या या चार दहशतवाद्यांवर इनाम जाहीर केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा