गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. यावर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुजरातमध्ये काँग्रेसला वीसचा टप्पाही गाठता आलेला नाही. तसेच हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं की, हिमाचलमधील निर्णयांक विजयासाठी हिमाचलच्या जनतेचे मनःपूर्वक धन्यवाद. तर गुजरातच्या पराभवावर ते म्हणाले की, आम्ही यापुढेही लढत राहू. सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन. तुम्ही घेतलेले कष्ट आणि झोकून देण्याची प्रवृत्ती अभिनंदनास पात्र आहेत. काँग्रेसने दिलेले सर्व आश्वासन आम्ही पूर्ण करू असा विश्वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
गुजरातमध्ये झालेल्या दारुण पराभवाबद्दल राहुल गांधी म्हणाले, गुजरातच्या जनतेचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो. आम्ही पुनर्रचना करू, कठोर परिश्रम करू आणि देशाच्या आदर्शांसाठी आणि राज्यातील जनतेच्या हक्कांसाठी लढा देत राहू. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून भाजपाने सर्वाधिक जागा जिंकून इतिहास रचला आहे.
हम गुजरात के लोगों का जनादेश विनम्रतापूर्वक स्वीकार करते हैं।
हम पुनर्गठन कर, कड़ी मेहनत करेंगे और देश के आदर्शों और प्रदेशवासियों के हक़ की लड़ाई जारी रखेंगे।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 8, 2022
हे ही वाचा :
भिवंडीत सराईत गुंड गणेश कोकाटेवर अज्ञात गुंडाचा गोळीबार
मुलानेच ७० वर्षीय आईची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, पण
हॉटेलमध्ये शिजला कापड व्यवसायिकाच्या हत्येचा कट
नाशिककरांची ८ तारीख ठरली ‘अपघाताची’
दरम्यान, भाजपाने गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यामध्ये भाजपाने १५६ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. त्याचवेळी पिछेहाट झालेल्या काँग्रेस पक्षाने १६ जागांवर विजय मिळवला आहे. तर पहिल्यांदाच गुजरात निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आम आदमी पक्षाने ४ जागा जिंकल्या आहे. तर चार अपक्षांनी विजय मिळवला आहे. तसेच, हिमाचलप्रदेशात ४० जागांवर विजय मिळवला भाजपाने आतापर्यंत २५ जागांवर विजय मिळवला. तर तीन अपक्षांचा विजय झाला आहे.