बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं नवीन कार्यालय सुरू झालं आहे. मुंबईतील मंत्रालयासमोर असलेल्या ठाकरे गटाच्या शिवालय कार्यालयाच्या बाजूला हे नवीन कार्यालय आहे. मंत्रालयाजवळील सी-२ या बंगल्यामध्ये शिंदे गटाचं पहिलं कार्यालय आहे. या नवीन कार्यालयातून कामकाजाला सुरुवात करण्यात येणार आहे
बाळासाहेब भवन असे नाव या कार्यालायाला देण्यात आले आहे. शिंदे गटाच्या या नवीन कार्यालयामध्ये एक भव्य सभागृह आहे. कार्यालयात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या तसबिरी भिंतीवर लावण्यात आल्या आहेत. या कार्यालयात नागरिकांसाठी विविध सुविधा आहेत. पत्रकार परिषद, बैठकांसाठी या सभागृहाचा उपयोग करण्यात येणार आहे. शिंदे गटाचे प्रमुखांसह प्रवक्ते आणि विविध पदाधिकाऱ्यांसाठी कार्यालयात वेगळी केबिन आहे.
हे ही वाचा :
काँग्रेसचा गुजरातमध्ये दारुण पराभव
आपचा गुजरातमध्ये भाजपाला नाही तर काँग्रेसला फटका
भाजपाची काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुसंडी
…आणि सात वर्षांनंतर मृत महिला परतली
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्याचे मध्यवर्ती कार्यालय कुठे असेल याची चर्चा सुरु झाली होती. शिंदे हे ठाण्याला राहत असल्याने आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ठाण्यातून सुरुवात झाल्याने त्यांचे मध्यवर्ती कार्यालय ठाण्यातच असेल असे बोलले जात होते. मुंबई ही देशाचं राजधानी असल्याने आणि मुंबईतूनच सर्व व्यवहार होत असल्याने नवीन मध्यवर्ती कार्यालय मुंबईतच असावे असेही म्हटल्या जात होते. त्यांनतर शिंदे गटाने मुंबईत जागेचा शोध सुरु केला होता.